पालघर: मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसे ग्रामपंचायती मधील ब्राम्हणगांव येथील दीपकच्या बहिनीचे महेंद्र भोयेशी लग्न झाले होते. महेंद्र दररोज दारू पिऊन येत आणि आपल्या पत्नीला त्रास देत होता. बहिनीला होणारा त्रास दीपकला बघवत नव्हता. अखेर रागाच्या भरात दीपकने 8 फेब्रुवारीला बुधवारी रात्री आपल्या बहिणीचा नवरा महेंद्रच्या डोक्यात कुऱ्हाडीने तीन वार करून त्याला जागीच ठार केले. या घटनेची माहिती मिळताच मोखाडा पोलिसांनी आरोपी दीपकला 9 फेब्रुवारीला अटक केली. त्याला जव्हारच्या प्रथम वर्ग न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास मोखाडा पोलीस करत आहेत.
भाड्याच्या वादातून हत्या : पालघर जिल्ह्यात भाड्याच्या वादातून हत्या झाल्याची घटना यापूर्वी घडली होती. प्रकरण असे की, विरारमधील ओला कॅबचालक असलेल्या संतोष झा (वय 45) याची लोणावळा येथे हत्या करून मृतदेह अमृतांजन ब्रीजजवळील दरीत फेकून देण्यात आला होता. या हत्येचा पोलिसांनी 3 जुलै, 2021 रोजी उलगडा केला. कर्नाटक निपाणी येथे भाड्याने घेऊन जात असलेल्या ओला कारमधील दोन प्रवाशांनी भाड्याच्या वादातून झा याची हत्या केल्याचे समोर आले होते.
जीपीएस प्रणालीमुळे हत्येचा उलगडा: विरारमधील ओला कॅबचालक असलेल्या संतोष झा (वय 45) याची लोणावळा येथे हत्या करून मृतदेह अमृतांजन ब्रीजजवळील दरीत फेकून देण्यात आला होता. या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला असून कर्नाटक निपाणी येथे भाड्याने घेऊन जात असलेल्या ओला कारमधील दोन प्रवाशांनी भाड्याच्या वादातून झा याची हत्या केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी या प्रकरणी कांदिवली येथील दोन सख्ख्या भावांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ओला कारमधील जीपीएस प्रणालीमुळे या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले होते.
आरोपींना 13 जूलैपर्यंत पोलीस कोठडी: युसूफ अली चाऊस व मुस्तकीन चाऊस या दोघांनी पनवेल येथे जाण्यासाठी ही ओला कार भाड्याने घेतली होती. अगोदर पनवेल व मग लोणावळ्यापर्यंत ही कार या दोघांनी बुक केली. मात्र लोणावळा येथे पोहोचल्यावर आमृतांजन ब्रीज परिसरात या दोघांबरोबर ओला चालक संतोष झा याचे भाड्याच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर या दोघांनी संतोष याची प्राणघातक शस्त्राने हत्या करून दीड किमी आतील रस्त्यावरून मृतदेह दरीत फेकून दिला होता. या दोन्ही आरोपींविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ अधिक तपास करीत होते. वसई न्यायालयाने 13 जूलैपर्यंत या दोघांना पोलीस कोठडी सुनावली होती.
हेही वाचा : Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन शुक्रवारपासून धावणार; या 'चार' कारणांमुळे खास आहे ट्रेन