ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : पालघरचे बंडखोर आमदार श्रीनिवास वणगा 'गद्दार'; फेसबुक पोस्ट व्हायरल

author img

By

Published : Jun 29, 2022, 10:35 AM IST

पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले आहे. वनगा यांना त्यांच्याच फेसबुक पेजवरून 'गद्दार' म्हणून शिक्का मारून पोस्ट करण्यात ( shrinivas vanga Traitor facebook post viral ) आली.

shrinivas vanga Traitor facebook post viral

पालघर - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ( Maharashtra Political Crisis ) बंडात सहभागी झालेल्या आमदारांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. आता पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले आहे. वनगा यांना त्यांच्याच फेसबुक पेजवरून टोला लगावण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांना थेट 'गद्दार' म्हणून शिक्का मारून पोस्ट करण्यात आली. त्यावरती जिल्ह्यातील शिवसैनिकांनी सुद्धा टीका केली ( shrinivas vanga Traitor facebook post viral ) आहे.

गद्दार असे लिहलेली फेसबुक पोस्ट

श्रीनिवास यांचे वडिल चिंतामण वणगा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार होते. त्यांच्या निधनानंतर पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने श्रीनिवास यांना उमेदवार देण्यास नकार दिला. श्रीनिवास यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यावेळी शिवसेनेने वणगा यांना आधार दिला होता. तर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सेनेने उमेदवारी देऊन त्यांना आमदारही केले. हेच वणगा आता बंडखोरांना साथ देत असल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे.

श्रीनिवास वणगा यांची प्रतिक्रिया

वणगा यांच्या फेसबुक पेजवरती 9 हजार फॉलोअर्स आहेत. मात्र, वणगा हे फेसबुकवर सक्रिय नसल्याने त्याचं अकाउंट कोणतरी निष्ठावंत शिवसैनिक हाताळत असावा. त्या शिवसैनिकाने गद्दार अशी पोस्ट टाकत वणगा यांची खिल्ली उडवली आहे. या घडलेल्या प्रकारानंतर वणगा यांनी प्रतिक्रिया देताना, माझे फेसबुक अकाउंट हॅक केले असून, माझ्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल याबाबत पोलिसांत तक्रार करणार आहे, असे वणगा यांनी सांगितलं.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा, बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.