ETV Bharat / state

'पालघर हत्याकांडप्रकरणी पोलिसांच्या निष्काळजीपणाचीही चौकशी करावी'

author img

By

Published : Apr 21, 2020, 5:49 PM IST

पालघर येथे झालेल्या हत्याकांडाप्रकरणाच्या चौकशीसाठी भाजपच्या वतीने आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आली. तसेच याप्रकरणाचा निषेध करण्यात आला. निश्चितपणे ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला व संत परंपरेला काळीमा लावणारी गोष्ट असल्याचे मत दरेकरांनी व्यक्त केले.

पालघर हत्याकांड प्रकरणी पोलिसांच्या निष्काळजीपणाचीही चौकशी करावी - प्रविण दरेकर

पालघर - जिल्ह्यात दोन साधू आणि एका वाहनचालकाची जमावाकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. साधू हत्याकांड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच पोलिसांच्या निष्काळजीपणाचीही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी, असे निवेदन आज भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बोरीवली येथे उपजिल्हा अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

पालघर येथे झालेल्या हत्याकांडाप्रकरणाच्या चौकशीसाठी भाजपच्या वतीने आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. तसेच याप्रकरणाचा निषेध करण्यात आला. निश्चितपणे ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला व संत परंपरेला काळीमा लावणारी गोष्ट असल्याचे मत दरेकर यांनी व्यक्त केले.

राज्य सरकारचे गुन्हेगारीवर नियंत्रण दिसत नाही. संचारबंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र कसा आला याची पोलिसांना काहीच माहिती नव्हती. तसेच घटनास्थळी पोलिसांनी आवश्यक कुमक घेऊन न गेल्यामुळे कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर गेली व दोन निष्पाप साधू व एका वाहनचालकाला आपला जीव गमवावा लागलाय, या घटनेमुळे राज्यातील हिंदुत्वावादी संघटना संतप्त झाल्या आहेत, असेही दरेकर यावेळी म्हणाले.

याप्रसंगी आमदार सुनील राणे, आमदार भाई गिरकर, आमदार मानिषा चौधरी व भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश खंडकर व अमर महेता उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.