ETV Bharat / state

विशेष : लॉकडाऊन काळात एसटीचे आर्थिक गणित कोलमडले; 'लालपरी'ला कोट्यवधींचा तोटा

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे मुख्य साधन असलेली लालपरी लॉकडाऊनमुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे. कोरोना काळात सुरुवातीच्या तीन महिने पूर्णपणे एसटी सेवा बंद राहिल्याने तसेच लॉकडाऊन उठल्यानंतरही नियमांचे बंधन व पुरेसे प्रवासी लाभत नसल्याने एसटीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यात पालघर विभागाचा जवळपास 40 कोटी 50 लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे.

palghar
पालघर एसटी विभाग
author img

By

Published : Jul 13, 2020, 6:58 PM IST

Updated : Jul 13, 2020, 8:53 PM IST

पालघर - सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची आणि ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे मुख्य साधन असलेली लालपरी लॉकडाऊनमुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे. लॉकडाऊन काळात एसटी एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रस्त्यावर धावत असली, तरीही प्रतिबंधित क्षेत्राचा अडथळा तसेच कोरोनामुळे प्रवाशांची घटलेली संख्या यामुळे एसटीला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या तीन महिन्यात पालघर एसटी विभागाचा जवळपास 40 कोटी 50 लाख रुपये इतका महसूल बुडाला असून यामुळे एसटी विभागाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

विशेष : लॉकडाऊन काळात एसटीचे आर्थिक गणित कोलमडले; 'लालपरी'ला कोट्यवधींचा तोटा

पालघर विभागांतर्गत पालघर, सफाळे, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर, नालासोपारा अशा आठ डेपोमधून एकूण 473 एसटी बस ताफ्यात आहेत. यामध्ये पालघर डेपोमध्ये 75, सफाळे डेपोमध्ये 29, वसई 64, अर्नाळा 67, डहाणू 52, जव्हार 57, बोईसर 68 तर नालासोपारा डेपोमध्ये 61 बसचा समावेश आहे. या सर्व डेपो मिळून दिवसाला तीन हजार पाच फेऱ्या आंतरराज्य, जिल्हा अंतर्गत, जिल्ह्याबाहेर तसेच स्थानिक व इतर फेर्‍या होत असतात. एकूण 473 एसटी बसमधून दिवसाकाठी 402 बसच्या प्रत्यक्षात फेऱ्या होत होत्या. या 402 बस मिळून दिवसाकाठी एक लाख 32 हजार 203 किलोमीटर एवढा पल्ला एसटी गाठत होती. तसेच लांब पल्ल्याच्या, मध्यम पल्ल्याच्या, शिवशाही, निमआराम, शयनयान अशा विविध प्रकारच्या एसटी बस पालघर एसटी विभागामार्फत चालवल्या जातात.

यामध्ये दिवसाकाठी आंतरराज्य सेवेच्या पाच फेऱ्या, शिवशाहीच्या 19 फेऱ्या, शिवशाही साध्या बसच्या दोन फेऱ्या इतर प्रकारात मोडणार्‍या शिवशाहीच्या सात फेऱ्या, निम आराम बसच्या लांब जाणाऱ्या एसटीच्या सहा फेऱ्या, निम आराम बसच्या मध्यम पल्ला जाणाऱ्या, रातराणी तीन फेऱ्या, लांब पल्ल्याच्या 99, मध्यम पल्ल्याच्या साध्या एसटी 14 फेऱ्या, ग्रामीण भागात चालवल्या जाणाऱ्या एकूण 42 फेऱ्या, मानव विकास व साधी बस, शटल सेवा अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या एकूण 199 बस तर 13 शहरी भागात दोन एसटी बसच्या फेऱ्या पालघर विभागांतर्गत चालविल्या जातात.

पालघर जिल्ह्यातील आठ डेपो मिळून पालघर एसटी विभागाचे दैनंदिन सरासरी उत्पन्न 45 लाख इतके आजवर राहिले आहे. मात्र कोरोना काळात सुरुवातीच्या तीन महिने पूर्णपणे एसटी सेवा बंद राहिल्याने तसेच लॉकडाऊन उठल्यानंतरही नियमांचे बंधन व पुरेसे प्रवासी लाभत नसल्याने एसटीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यात पालघर विभागाचा जवळपास 40 कोटी 50 लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांनीदेखील एसटी प्रवास कमी केल्याचे चित्र असून सद्य स्थितीत एसटीला 8 ते 10 लाख इतके दैनंदिन सरासरी उत्पन्न मिळत आहे.

कोरोना संकटाच्या या काळात पालघर जिल्ह्यातून ठाणे, मुंबई आदी ठिकाणी कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा लालपरी उभी राहिली व एसटीची सेवा मर्यादित सुरू राहिली. यानंतर नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर जिल्हा अंतर्गत एसटी सेवा सुरू झाली. तरीही एसटी सेवा तुरळक होती. त्यामुळे अजूनही एसटीच्या महसूलाची घट भरून निघालेली नाही. आता यापुढे आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी मिळाल्यामुळे दररोज सुमारे तीनशे वाहने दैनंदिन फेरीसाठी चालवल्या जाणार असल्याचे समजते.

एकीकडे लालपरी अडचणीत आली असतानाच एसटीच्या मालवाहतूक विभागामार्फत चालवल्या जाणारा एसटी मालवाहतूक ट्रकद्वारे विभागाला महसूल मिळवून देत आहे. लॉकडाऊन दरम्यान खासगी माल वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने एसटीने आपले मालवाहतूक सेवा सुरू करून सर्वांनाच एक प्रकारचा दिलासा दिला आहे. तसेच अनेकांनी मालवाहतुकीसाठी एसटीला प्राधान्य दिल्यामुळे एसटीची मालवाहतूक सेवा पुन्हा एकदा उभारी घेऊ लागली आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर कोरोना काळात एसटी ही अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी धावून आली. त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी एसटीचा मोठा वाटा राहिला आहे. तरीही एसटी आजही उपेक्षितच असून हजारो प्रवाशांना वाहून नेणारी एसटी आज एकाकी पडली आहे. तिला पुन्हा नव्या उभारीची आवश्यकता असून शासनाने यासाठी तशी पावले टाकायला हवीत.

Last Updated : Jul 13, 2020, 8:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.