वसई - वसईत स्मार्ट फोनचा वापर ( Use of smart phones ) करणं साडे तीन वर्षांच्या चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरून मोबाईलच्या नादात खाली पडून साडे तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी ( Little girl dies after falling from building ) मृत्यू झाला आहे.
श्रेया महाजन ( Shreya Mahajan ) असं या मयत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. वसई पश्चिमेच्या अग्रवाल कॉम्प्लेक्स मधील रेजन्सी वीला ( Regency Villa ) या इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सातव्या मजल्यावर राहणाऱ्या श्रद्धा महाजन या शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे श्रेयाच्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या.
हेही वाचा - Arjun Khotkar : दिल्लीवारीनंतर अर्जुन खोतकर जालन्यात दाखल; शिवसेना की शिंदे गट? पाहा, काय म्हणाले...
यावेळी श्रेया घरात एकटीच झोपली होती. मात्र, काही वेळाने श्रेयाला आल्यानंतर मोबाईल वर खेळता खेळता ती बाल्कनीमध्ये आली. यावेळी तिच्या हातातील मोबाईल खाली पडला. खाली डोकावताना तिचा तोल गेला जावून खाली पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा - Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत, ठाण्यातील न्यायालयात याचिका दाखल