पालघर - जिल्ह्यातील मनोर पोलिसांनी कुडे येथे एका दुकान मालकाच्या घरी छापा टाकत गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा माल जप्त केला. यामध्ये 75 गोणी काळा गूळ व 2 गोणी नवसागरचा साठ्याचा समावेश आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आले आहे
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे इतर दुकानांबरोबर दारूचे दुकाने देखील बंद आहेत. मात्र, तळीरामांना राहावेना म्हणून त्यांना गावठी दारूकडे धूम ठोकलेली पाहायला मिळत आहे. कुडे गावातील पाटील पाडा येथे एका किराणा दुकानात गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा काळा गूळ आणि नवसागराचा मोठा साठा असल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी किराणा दुकान मालक रमाकांत पाटील यांच्या घरी छापा टाकला असता त्यांना येथे मोठ्या प्रमाणात नवसागर व काळ्या गुळाचा साठा आढळून आला. पोलिसांनी 75 गोणी काळे गूळ व आणि 2 गोणी नवसागर जप्त केला असून याप्रकरणी आरोपीवर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघरमध्ये गावठी दारूसाठी लागणारा 75 गोणी काळ्या गुळासह 2 गोणी नवसागराचा साठा जप्त
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे इतर दुकानांबरोबर दारूचे दुकाने देखील बंद आहेत. मात्र, तळीरामांना राहावेना म्हणून त्यांना गावठी दारूकडे धूम ठोकलेली पाहायला मिळत आहे.