पालघर - वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्णामध्ये वाढ होत आहे. आज (रविवार) दिवसभरात या परिसरात 31 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज 21 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज 31 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 507 झाली आहे. तर आज उपचारादरम्यान कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तसेच आत्तापर्यंत एकूण 53 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. क्षेत्रात आतापर्यंत 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 689 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वसई विरारमध्ये गेल्या 24 तासांत 31 कोरोनाग्रस्तांची नोंद - palghar news
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्णामध्ये वाढ होत आहे. आज (रविवार) दिवसभरात या परिसरात 31 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.