ETV Bharat / state

पालघर : वसईत पर्यटनबंदी नसल्याने पर्यटकांची मोठी गर्दी; कोरोना नियमांचाही विसर

वसईतील प्रसिद्ध तुंगारेश्‍वर येथे पर्यटकांनी चांगलीच गर्दी केल्याचे पहायला मिळाले. धबधबध्यावर आलेल्या अनेक पर्यटकांनी कोरोनाचे नियमांना धाब्यावर बसवल्याचे पहायला मिळाले. तर दुसरीकडे वसईपूर्वेतील कामण देवकुंडी येथील नदीवरही मोठ्या संख्येने पर्यटकांची रेलचेल सुरू होती. वसईतील तुंगारेश्‍वर आणि चिंचोटी धबधबा हे पर्यटनासाठी काही वर्षांपासून धोकादायक ठरले आहेत.

वसई गर्दी
वसई गर्दी
author img

By

Published : Jun 15, 2021, 5:23 PM IST

Updated : Jun 15, 2021, 5:48 PM IST

वसई (पालघर) - पावसाळा सुरू झाला असून नदी, नाले, धबधबे हे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांची पावले पर्यटनस्थळी वळू लागली आहेत. अशात पर्यटन बंदीच्या नियमातून वसई तालुका वगळण्यात आल्याने शनिवार-रविवार पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. मान्सूनच्या कालावधीमध्ये धबधब्याच्या ठिकाणी होत असलेल्या दुर्घटना रोखण्यासाठी दरवर्षी धोकादायक ठरत असलेल्या पर्यटनस्थळी जिल्हा प्रशासनाकडून बंदी घातली जाते. मात्र यावेळी बंदीच्या नियमावलीत जिल्ह्यातील वसई तालुका वगळता इतर सात तालुक्यातच पर्यटन बंदी लागू केली आहे. त्यामुळे याचाच फायदा घेत शनिवार व रविवार वसईतील तुंगारेश्वर धबधबा, चिंचोटी, कामण देवकुंडी अशा विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळी गर्दी केली होती.

वसईत पर्यटनबंदी नसल्याने पर्यटकांची मोठी गर्दी

पर्यटकांची गर्दी

वसईतील प्रसिद्ध तुंगारेश्‍वर येथे पर्यटकांनी चांगलीच गर्दी केल्याचे पहायला मिळाले. धबधबध्यावर आलेल्या अनेक पर्यटकांनी कोरोनाचे नियमांना धाब्यावर बसवल्याचे पहायला मिळाले. तर दुसरीकडे वसईपूर्वेतील कामण देवकुंडी येथील नदीवरही मोठ्या संख्येने पर्यटकांची रेलचेल सुरू होती. वसईतील तुंगारेश्‍वर आणि चिंचोटी धबधबा हे पर्यटनासाठी काही वर्षांपासून धोकादायक ठरले आहेत. अनेक पर्यटकांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विकेण्डला मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली व वसई परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी गर्दी करतात. मद्यपान करून धबधब्यात अंघोळीला उतरल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दोन वर्षांपूर्वी पावसाचा वेग वाढल्याने चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक अडकून पडल्याची घटना घडली होती. तर पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहत जाणे यासारख्या प्रकारही घडले आहेत. त्यामुळे पुन्हा नागरिकांकडून कोरोना नियमांना हरताळ फासल्याचे पहायला मिळाले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

कोरोनाचे संकट हळूहळू कमी होऊ लागल्याने पर्यटकांचा ओढा हा पर्यटनस्थळी वाढू लागला होता. त्यातच शनिवारी पर्यटन स्थळाच्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व इतर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होती. याला रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून रविवारी पोलिसांनी तुंगारेश्वर, कामण देवकुंडी अशा पर्यटनस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यामुळे पर्यटनासाठी दाखल झालेल्या पर्यटकांना प्रवेशद्वारावरूनच माघारी परतावे लागले आहे. यामुळे अतिउत्साहात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला.

हेही वाचा -Maratha Reservation : कोल्हापुरात उद्या 'मूक आंदोलन'; आंदोलस्थळाची संभाजीराजेंनी केली पाहणी

Last Updated : Jun 15, 2021, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.