पालघर- डहाणू येथील इराणी रोडवरील अभ्यंकर कंपाउंड परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएमच्या गाळ्याला अचानक आग लागली. आगीत एटीएम वाचले असून गाळ्याच्या आतील सर्व फर्निचर जळून खाक झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अदानी कंपनीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत ही आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.