ETV Bharat / state

कुख्यात गुंड जावेद अन्सारीची पोलिसांनी काढली धिंड?; व्हिडीओ व्हायरल

मागील आठवड्यात तुळींज पोलिसांनी अटक केली होती. सध्या पोलीस कोठीडीत असलेल्या या गुंडाला सोमवारी दुपारी खुलेआम परिसरात फिरवण्यात आले. त्याचे व्हिडीओ काढून नागरिकांनी समाज माध्यमांवर फिरवले.

palghar latest news
palghar latest news
author img

By

Published : Sep 21, 2021, 2:42 PM IST

Updated : Sep 21, 2021, 5:12 PM IST

पालघर - नालासोपारामधील कुख्यात गुंड जावेद अन्सारी याला मागील आठवड्यात तुळींज पोलिसांनी अटक केली होती. सध्या पोलीस कोठीडीत असलेल्या या गुंडाला सोमवारी दुपारी खुलेआम परिसरात फिरवण्यात आले. त्याचे व्हिडीओ काढून नागरिकांनी समाज माध्यमांवर फिरवले.

व्हिडीओ

चर्चेला उधाण -

नालासोपारा परिसरातील जावेद अन्सारी यावर नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु जावेद सतत पोलिसांच्या हातवार तुरी देत होता. शेवटी मागील आठवड्यात पोलिसांनी त्याला अटक केली. सोमवारी पोलिसांनी त्याला गालानगर, शिर्डी नगर परिसरात बेड्या घालून फिरवले. त्याच्या तोंडावर कोणत्याही प्रकारचे आवरण घातले नव्हते. संपूर्ण परिसरात फिरवत असताना नागरिकांनी त्याचे चित्रीकरण करत ते व्हिडीओ समाज मध्यामंवर फिरवले. तसेच या गुंडाची दहशत कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी पोलिसांनी हे काम केल्याची चर्चा रंगली. या संदर्भात माहिती देताना तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले की, त्याला असेच फिरवले नाही. गुन्हाचा पंचनामा करण्यासाठी त्याला या ठिकाणी नेण्यात आले होते.

हेही वाचा - वैफल्याग्रस्त अनंत गीतेंचे राष्ट्रवादी संदर्भातील 'ते' वक्तव्य नैराश्यातून, खासदार सुनील तटकरेंचे प्रत्युत्तर

Last Updated : Sep 21, 2021, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.