ETV Bharat / state

पालघर : नालासोपाऱ्यात आंतरराज्यीय 'घोडासहान' टोळीला अटक - पालघर बातमी

दरोडा टाकण्यासाठी आले असता पोलिसांनी शिताफीने सात आरोपींच्या जागीच मुसक्या आवळल्या. तर काहींनी यावेळी पळ काढला असता पोलिसांनी पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी एक आरोपी फरार झाला.

घोडासाहन
घोडासाहन
author img

By

Published : Jun 16, 2021, 8:31 PM IST

वसई (पालघर) - नालासोपारा पूर्व येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या घोडासहान टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अकरा पैकी दहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून एक आरोपी मात्र फरार झाला आहे. वसई न्यायालयाने या दहा आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

अशी झाली अटक

नालासोपारा पूर्व पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यासाठी ही टोळी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट दोन व तीनच्या पोलिसांना लागली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे गुन्हे शाखेचे युनीट दोनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते व गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त डाॅ.महेश पाटील यांना माहिती दिली होती. त्यानंतर या पेट्रोलपंप परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी ही टोळी दरोडा टाकण्यासाठी आले असता पोलिसांनी शिताफीने सात आरोपींच्या जागीच मुसक्या आवळल्या. तर काहींनी यावेळी पळ काढला असता पोलिसांनी पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी एक आरोपी फरार झाला. त्यांच्याकडून लोखंडी कोयते, बॅटऱ्या नाॅयलाॅन दोऱ्या, चार लोखंडी कटावण्या, मिरची पूड, मोबाइल फोन व रोख रक्कम असा 1 लाख 64 हजार 810 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गॅंगने महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, तेलंगाणा या राज्यात धुडगूस घातला होता. वसई सत्र न्यायालयात या दहा आरोपींना हजर केले असता न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही टोळी इतरही लहान मोठ्या चोऱ्या करत असल्यातचे पुढे आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा -ठाणे : भिवंडीत भाजपा नगरसेवकाची तक्रारदाराला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.