पालघर - वसई विरार महापालिका परिवहन सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात आयुक्तांविरोधात घोषणा करणाऱ्या मनसेच्या सहा ते सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेचा लोकार्पण कार्यक्रम आज दुपारी वसंतनगरी परिसरात पार पडला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हा राडा घातला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना वसई महापालिकेचे आयुक्त गंगारथण डी हे भेट देत नसल्याच्या कारणावरून या कार्यकर्त्यांनी भर कार्यक्रमात आयुक्तांविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी तातडीने पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले व धक्के मारून कार्यक्रमातून बाहेर काढले. यावेळी एका सेनेच्या कार्यकर्त्याने मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना धक्का बुक्की करत मारहाण केली. माणिकपूर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई द्या-खासदार कपिल पाटील