पालघर - तौक्ते चक्रीवादळामुळे पालघरच्या वडराई समुद्रात जहाज भरकटून खडकात अडकले होते. या जहाजामध्ये अडकलेल्या सर्व १३७ जणांना वाचवण्यात मंगळवारी तटरक्षक दलाला यश आले.
हेलिकॉप्टरच्या सहाय्याने 137 जणांना बाहेर काढले
पालघरमधील समुद्रात रायगडच्या बाजूने गाल कन्स्ट्रॅक्टरचे (ONGC) एक जहाज येत होते. हे जहाज पालघरच्या वडराई भागात पहाटे ३ च्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे भरकटले. त्यामुळे ते जहाज खडकात अडकले. या जहाजात १३७ जण अडकल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. त्यानंतर तटरक्षक दलाकडून या १३७ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. तटरक्षक दलाच्या 3 हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या जहाजावर अडकलेल्या १३७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा - फक्त १५ मिनिटांत उरकले सोनाली कुलकर्णीचे लग्न!