ETV Bharat / state

जव्हार येथे कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी बाल संजीवन छावणी, अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन - आदिवासी मुली

कुपोषणाची तीव्रता लक्षात घेऊन बाल संजीवन छावणीचा विस्तार करून एक प्रशस्त व सुसज्य अशी इमारत बांधण्यात आली आहे. यात एका वेळी 100 कुपोषित बालकांना, तसेच त्यांच्या आई व इतर भावंडाना सामान्य स्थितीत येईपर्यंत आवश्यक उपचार आणि पोषण आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचसोबत स्तनदा माता व गरोदर महिलांसाठी देखील येथे आवश्यक उपचार आणि पोषण आहार देण्यात येणार आहे.

अमृता फडणवीस
author img

By

Published : Jul 27, 2019, 12:52 PM IST

पालघर - जिल्ह्यातील जव्हार येथे तीव्र व अती तीव्र कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी बांधण्यात आलेल्या श्री विठू माऊली ट्रस्ट, समर्थन आणि श्रमजीवी संघटनेच्या बाल संजीवन छावणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पालघर मधील जव्हार आणि मोखाडा येथील भीषण कुपोषण दूर करण्यासाठी ही छावणी महत्त्वाची भूमिका बजावेल असे मत अमृता फडणवीस व ट्रस्टचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी व्यक्त केले आहे.

श्री विठू माऊली ट्रस्ट, समर्थन आणि श्रमजीवी संघटना जानेवारी 2015 पासून जव्हार येथे एक बाल संजीवन छावणी चालवत आहे. मात्र, कुपोषणाची तीव्रता लक्षात घेऊन या छावणीचा विस्तार करून एक प्रशस्त व सुसज्य अशी इमारत बांधण्यात आली आहे. यात एका वेळी 100 कुपोषित बालकांना, तसेच त्यांच्या आई व इतर भावंडाना सामान्य स्थितीत येईपर्यंत आवश्यक उपचार आणि पोषण आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचसोबत स्तनदा माता व गरोदर महिलांसाठी देखील येथे आवश्यक उपचार आणि पोषण आहार देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी आदिवासी मुलींसाठी नर्सींग ट्रेनींग सेंटर सुरु करण्यात येणार आहे.

बाल संजीवन छावणीचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, श्रमजीवी संघटना आणि समर्थन संस्थेच्या माध्यमातून गेले काही वर्ष जव्हार मोखाड्यातील कुपोषित बालकांसाठी निवडक गावांमध्ये पूरक आहार पुरवित असून पालकांमध्ये जनजागृती करणे तसेच शासनाकडून या बालकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. यातूनच बालसंजीवनी छावणीची संकल्पना पुढे अली. या छावणीच्या माध्यमातून बालकांची तपासणी करणे, या बालकांपैकी अतीतिव्र कुपोषित (SAM) असलेल्या बालकांना छावणीमध्ये दाखल करून त्यांना प्रथिनयुक्त पूरक आहार आणि जीवनसत्वेयुक्त आहार देणे. तसेच ज्या बालकांना तातडीच्या उपचाराची आवश्यकता आहे अशा बालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे इत्यादी कामे केली जात आहेत.

अशाप्रकारे एका बाजूला सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरुन लढाई लढणे, तर दुसऱ्या बाजूला कुपोषणासारखा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी शासनाबरोबर सहकार्य करत ठोस उपाय योजना राबवने, ज्या फक्त जव्हार मोखाड्यातीलाच नव्हे तर संपूर्ण राज्याला कुपोषणमुक्त करण्यासाठी आदर्श ठरतील, अशा योजनेची अंमलबजावणी श्री विवेक पंडित यांच्या श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, श्रमजीवी संघटना आणि समर्थन संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे. तसेच कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्याच्या हेतूने बालसंजीवन छावणी सुरु करण्यात आली आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे व रवींद्र फाटक, पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर व श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:जव्हार येथे कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी बांधण्यात आलेल्या बाल संजीवन छावणीचे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनBody:
जव्हार येथे कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी बांधण्यात आलेल्या बाल संजीवन छावणीचे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नमित पाटील,
पालघर,दि.27/7/2019

पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे तीव्र व अती तीव्र कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी बांधण्यात आलेल्या श्री विठू माऊली ट्रस्ट, समर्थन आणि श्रमजीवी संघटनेच्या बाल संजीवन छावणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. पालघर मधील जव्हार आणि मोखाडा येथील भीषण कुपोषण दूर करण्यासाठी ही छावणी महत्वाची भूमिका बजावेल असे मत अमृता फडणवीस व ट्रस्टचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी व्यक्त केले आहे.

श्री विठू माऊली ट्रस्ट, समर्थन आणि श्रमजीवी संघटना जानेवारी 2015 पासून जव्हार येथे एक बाल संजीवन छावणी चालवत आहे. मात्र कुपोषणाची तीव्रता लक्षात घेऊन या छावणीचा विस्तार करून एक प्रशस्त व सुसज्य अशी इमारत बांधण्यात आली असून यात एका वेळी 100 कुपोषित बालकांना, तसेच त्यांच्या आई व इतर भावंडाना सामान्य स्थितीत येईपर्यंत आवश्यक उपचार आणि पोषण आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचसोबत स्तनदा मातव गरोदर महिलांसाठी देखील येथे आवश्यक उपचार आणि पोषण आहार देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी आदिवासी मुलींसाठी नर्सींग ट्रेनींग सेंटर सुरु देण्यात येणार आहे.

श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, श्रमजीवी संघटना आणि समर्थन संस्थेच्या माध्यमातून गेले काही वर्ष जव्हार मोखाड्यातील कुपोषित बालकांसाठी निवडक गावांमध्ये पूरक आहार पुरवित असून पालकांमध्ये जनजागृती करणे तसेच शासनाकडून या बालकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातूनच बालसंजीवनी छावणीची संकल्पना पुढे अली. या छावणीच्या माध्यमातून बालकांची तपासणी करणे, या पैकी अतीतीव्र कुपोषित (SAM) असलेल्या बालकांना छावणीमध्ये दाखल करून त्यांना प्रथिनेयुक्त पूरक आहार आणि जीवनसत्वेयुक्त आहार देणे. तसेच ज्या बालकांना तातडीच्या उपचाराची आवश्यकता आहे अशा बालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाते.

अशाप्रकारे एका बाजूला सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावरची लढाई लढतानाच दुसऱ्याबाजूला कुपोषणासारखा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी शासनाबरोबर सहकार्य करून ठोस उपाय योजना ज्या फक्त जव्हार मोखाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्याला कुपोषणमुक्त करण्यासाठी आदर्श ठरेल अश्या योजनेची अंमलबजावणी श्री विवेक पंडित यांच्या श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, श्रमजीवी संघटना आणि समर्थन संस्थेच्या माध्यमातून राबवली जात आहे. कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्याच्या हेतूने बालसंजीवन छावणी सुरु करण्यात आली आहे.

या उद्घाटन कार्यक्रमास राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे व रवींद्र फाटक, पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर व श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.