पालघर - तारापूर औद्योगिक वसाहतीत शनिवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास तारा नाइट्रेट (एन. के. फार्मा) या कंपनीत झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोन कर्त्या महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे या परिवारावरील आईचं छत्र हरवलं असून दोन चिमुकल्या जखमी आहेत.
हेही वाचा - तारापूर औद्योगिक वसाहत दुर्घटना: आठवा मृतदेह सापडला, एनडीआरएफची शोधमोहीम पूर्ण
बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीतील तारा नायट्रेट कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेत वशिष्ठ सिंग यांच्या पत्नी माधुरी सिंग आणि सून निशू सिंग यांचा जागीच ठार झाल्या आहेत. वशिष्ठ यांच्या दोन चिमुकल्या नाती प्राची (वय-6) आणि रुतिका (वय-4) या चिमुकल्या जखमी आहेत. मूळचे बिहार येथील असलेले वशिष्ठ सिंग मागील 25 वर्षांपासून आपल्या कुटुंबासह बोईसर येथे कामासाठी स्थायिक झाले. मात्र, काल संध्याकाळी तारा नायट्रेट कंपनी झालेल्या दुर्घटनेत त्यांच्या कुटुंबावर घाला घातला. पत्नी माधुरी आणि सून निशू कंपनीत काम करत असतानाच या कंपनीत रिऍक्टर चा भीषण स्फोट झाला आणि या दोघी ठार झाल्या.
राहुल सिंग (मृत निशा सिंग यांचा पती) हा याच कंपनीत काम करत होता. मात्र, तो कंपनी बाहेरील दुकानामध्ये चॉकलेट घेण्यास बाहेर पडला आणि हा स्फोट झाल्याने राहुल बचावला. तर बाहेर खेळत असलेल्या दोन चिमुकल्यांच्या अंगावर दगड पडल्याने त्या जखमी झाल्या आहेत.
हेही वाचा - तारापूर औद्योगिक वसाहत दुर्घटना: पालकमंत्र्यांनी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर