पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ( Mumbai-Ahmedabad National Highway ) क्रमांक- ४८ मधील रस्त्यामध्ये पडलेले खडे, साचलेले पाणी, गाळ काढण्याचे काम त्वरित करा अन्यथा टोल बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील ( MLA Rajesh Patil ) यांनी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया ( National Highway Authority of India ) यांना एका पत्राद्वारे दिले आहे. सदरील पत्रात त्यांनी नमूद केले आहे की मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- 48 हा पालघर जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाणारा एकमेव महामार्ग आहे.
अपघाताचे प्रमाण वाढले - सदरील महामार्गाला पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, विक्रमगड, तलासरी ही महत्त्वाची तालुके जोडलेली असल्याने बहुतांश नागरिक हे या मार्गावरून वसई- विरार शहर, मुंबई शहर, ( Mumbai city ) ठाणे शहर, गुजरात या ठिकाणी कामाच्या निमित्ताने येजा करीत असतात. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे ( potholes on highway due to rain ) पडलेले आहेत. तसेच महामार्गाच्या डिव्हायडर लगत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून बऱ्याचशा लोकांचा अपघात होऊन मृत्यु झाला आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर ते तलासरी पर्यंत पडलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करा, रस्त्यावर साचलेले पाणी व साचलेला गाळ काढणे, अपूर्ण सर्विस रोड आदी कामे तात्काळ पूर्ण करा अन्यथा टोलबंदी आंदोलन करण्यात येईल असा इशारा व आदेश बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया च्या व्यवस्थापकाला दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी होते किंवा नाही याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - Hadgaon Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन ठार