पालघर : पालघर-मनोर बसस्थानकाच्या परिसरात अवैधरित्या होत असलेल्या (illegal parking in area of Palghar Manor bus stand) पार्किंगमुळे, बस चालकास बस वळवताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बस सोडण्यासाठी वेळ लागत असल्याने, प्रवाशांची सुद्धा गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेकदा लेट मार्क चा सामना करावा लागत आहे. अश्या अनेक अडचणींमुळे हे बस स्थानक मोकळ्या जागेवर (there is demand to change location of bus stand) करण्यात यावे, अशी मागणी मनोरवासीयांकडून होत आहे. Bus Stand Issue
मनोर हे वर्दळीचे ठिकाण असून; मनोरच्या आजूबाजूस सुमारे 30 ते 35 पाडे आहेत. खरेदी विक्रीसाठी त्यांना मनोर गाठावे लागते. पालघरला किंवा बोईसरला जायचे असल्यास गावात येऊन त्यांना एसटी पकडावी लागते. त्यामुळे मनोर बाजार हा नेहमीच गजबजलेला असते. मनोर बस स्थानक देखील गावाच्या मध्यभागी असल्याने, खरेदीसाठी आलेले नागरिक जिथे जागा मिळेल, तिथे आपल्या दुचाकी ठेवून खरेदीसाठी जात असतात. त्यामुळे एखादी बस आल्यावर कधी कधी बसला उभे राहायला सुद्धा जागा नसते. इतकी कठीण परिस्थितीत अवैध पार्किंगमुळे झाली आहे. त्यामुळे नोकरी धंद्यासाठी जाणाऱ्या नोकरदार वर्गास कामावर पोहोचण्यासाठी वेळ लागतो व लेटमार्कचा सामना ही करावा लागतो.
मनोर गावाची व आजूबाजूची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, ग्रामपंचायत व पालघर एसटी विभागाने संयुक्तिकरित्या एकत्र येऊन त्यावर तोडगा काढला पाहिजे. तरच हा रोजचा त्रास संपुष्टात येईल. अन्यथा दररोज होणारा त्रास तसाच राहणार असेल तर, मनोर बसस्थानकाची जागा बदलून प्रशस्त जागेत बस स्थानक नेल्यास प्रवाशांना होणाऱ्या त्रासातून मुक्तता होईल. यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी मनोरवासीयांकडून होत आहे.
दरम्यान बसस्थानक परिसरात अवैधरित्या वाहन पार्किंग करणाऱ्यांवर मनोर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित असताना, तसे होताना दिसत नसल्याने, कोणी कुठेही कशाही पद्धतीने गाड्या पार्किंग करतात, अशांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेक ठीकाणी बस स्थानकाच्या परिसरात बाजारपेठ असल्यामुळे बस चलकांसोबतच प्रवाशांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच परिसरातील नागरिक कुठल्याही प्रकारची द्या माया न दाखवता गाड्या चालवतात. यामुळे अनेकदा अपघात घडतांना दिसुन येते. Bus Stand Issue