पालघर - वाणगाव येथील आखरमल पाडा येथे घरालगत असलेल्या शेतात लपवून ठेवलेला अवैध दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. दादरा नगर हवेली येथे विक्री करण्यासाठी हा मद्यसाठा करून ठेवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी घर मालक विजय नथू दाडेकर व रवी शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला जव्हारचा 567 वा शाही उरूस उत्साहात
राज्य उत्पादन शुल्क विभागाला वाणगाव येथील आखरमल पाडा येथील रहिवासी विजय नथू दाडेकर यांनी आपल्या शेतात अवैध मद्य लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकत विजय दाडेकर यांच्या घराच्या आसपासच्या झडती घेतली. त्यावेळी मद्याचा साठा आढळून आला. यावेळी 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी विजय नथु दाडेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, अवैध दारू पुरवठा करणाऱ्या रवी शेलार फरार घोषित करण्यात आले आहे.
हेही वाचा - बोटीवर कामात मदत न करता बडबड केल्याने साथीदाराचा खून
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक विजय भुकन व उप अधीक्षक एम.एच. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष जाधव, दुय्यम निरीक्षक काटकर यांनी केली.