ETV Bharat / state

वसईत गळा आवळून पत्नीची हत्या, आरोपी पती गजाआड - पतीने केली पत्नीची हत्या

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुलीस्ता मोहम्मद जावेद अन्सारी (वय 25) या विवाहितेची तिचा पती जावेद अन्सारी याने राहत्या घरी गळा आवळून हत्या केली होती.

Husband murdered his wife
गळा आवळून पत्नीची हत्या
author img

By

Published : Dec 18, 2019, 9:55 PM IST

पालघर - पत्नी मनासारखी वागत नाही, हा राग मनात धरून पतीने राहत्या घरी तिची गळा आवळून हत्या केल्याची घटना वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. 9 डिसेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडल्यानंतर फरार झालेल्या पतीला पोलिसांना अटक केली आहे. जावेद अन्सारी, असे आरोपीचे नाव आहे.

वसईत गळा आवळून पत्नीची हत्या

हेही वाचा - मनोर - पालघर रस्त्यावर अज्ञात वाहन आणि दुचाकीचा अपघात, दोन ठार

याबाबत अधिक माहिती अशी की, वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुलीस्ता मोहम्मद जावेद अन्सारी (वय 25) या विवाहितेची तिचा पती जावेद अन्सारी याने राहत्या घरी गळा आवळून हत्या केली होती. मृत गुलीस्ता हिचा जावेदसोबत 4 महिन्यापूर्वीच निकाह झाला होता. पहिल्या पतीने तलाक दिल्यानंतर तीने जावेदसोबत लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर जावेदसोबत घरातील किरकोळ कारणावरून तिचा वाद होत होता.

हेही वाचा - वाहतूक कोंडी सुटेल पण, बाधीतांच्या पुनर्वसनाचे काय?

गुलीस्ता मनासारखे वागत नाही, आपल्या आई-वडिलांकडेही आपल्याला जाऊ देत नाही, या गोष्टीवरून 9 डिसेंबरच्या मध्यरात्री जावेद आणि गुलीस्ताचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी जावेदने रागाच्या भरात गुलीस्ताचा गळा आवळून खून केला. यानंतर तो उत्तर प्रदेशात पळून गेला. मात्र, आठवड्याभरात पैसे संपल्यानंतर तो नालासोपारा येथील रिचर्ड कंपाऊंड येथे आला असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली.

Intro:वसईत पत्नीची गळा आवळून हत्या करणा-या नराधम पतीला अटक...
९ डिसेंबरच्या मध्यरात्री हत्या केल्यानंतर पती होता फरार...Body:स्लग : वसईत पत्नीची गळा आवळून हत्या करणा-या नराधम पतीला अटक...
९ डिसेंबरच्या मध्यरात्री हत्या केल्यानंतर पती होता फरार...

पालघर / वसई : पत्नी मनासारखी वागत नाही हा राग मनात धरून पतीने राहत्या घरी तीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना वालीव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. ९ डिसेंबरच्या मध्यरात्री हि घटना घडल्यानंतर फरारी झालेल्या पतीचा पोलिस तपास घेत होते.. हत्या केल्यानंतर जावेद उत्तर प्रदाशला पळून गेला होता.मात्र आठवड्याभरात पैसे संपल्यानंतर तो नालासोपारा येथील रिचर्ड कंपाऊंड येथे आला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.वालीव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुलीस्ता मोहम्मद जावेद अन्सारी (वय २५) या विवाहितेचा तीचा पती जावेद अन्सारी याने राहत्या घरी गळा आवळून हत्या केली होती.मृत गुलीस्ता हिचा जावेदसोबत अवघ्या चार महिन्यापूर्वी निकाह झाला होता.पहिल्या पतीने तलाक दिल्यानंतर तीने जावेदसोबत सोयरीक जमवली होती.मात्र लग्नानंतर जावेदसोबत घरातील किरकोळ कारणावरून तीचा वाद होत होता. गुलीस्ता मनासारखं वागत नाही,आपल्या आई-वडीलांकडेही आपल्याला जाऊ देत नाही या गोष्टीवरून ९ डिसेंबरच्या मध्यरात्री तीचे कडाक्याचं भांडण जावेदसोबत झाल्यानंतर त्याने रागाच्या भरात तीचा गळा आवळून हत्या केली होती.हत्या केल्यानंतर जावेद उत्तर प्रदाशला पळून गेला होता.मात्र आठवड्याभरात पैसे संपल्यानंतर तो नालासोपारा येथील रिचर्ड कंपाऊंड येथे आला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

बाईट : अनंत पारड , पोलीस उपनिरीक्षक वालीव पोलिस ठाणेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.