ETV Bharat / state

नव्या चक्रीवादळाच्या भीतीने शेतकरी चिंतेत, अवकाळी पावसाने रब्बीवर दुबार पेरणीचे संकट? - रब्बी पीक

कोकणात नव्या चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रब्बी हंगामातील बियाणे पेरले गेले असून अती पावसामुळे हे पीक वाया जाण्याची शक्यता आहे. यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.

palghar
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 5, 2019, 10:43 PM IST

पालघर - कोकणात नव्या चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह उत्तर कोकणातील पालघर जिल्हातही ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या अगोदर १ डिसेंबरला पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगडसह काही भागात रात्री 8 च्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर, आज (गुरुवार) सायंकाळी 4 च्या सुमारास वाडा तालुक्यासह इतर तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या परिस्थितीत रब्बी हंगाम घ्यायचा की नाही, या चिंतेत सध्या शेतकरी सापडला आहे.

नव्या चक्रीवादळाच्या भीतीने शेतकरी चिंतेत

रब्बी हंगामातील बियाणे पेरले गेले आहे, त्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट पिकावर आहे. ही पेरलेली बियाणं अती पावसाने वाया जाण्याच्या शक्यतेने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील कोकण किनारपट्टीवर या अगोदर 'क्यार' महाचक्रीवादळाचा तडाखा बसला होता. असे असताना आता नवे वादळ तयार होत असल्याची माहिती आहे. या निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा निर्माण झाला होता. अवकाळी पावसाने खरीप हंगामातील शेतकरी वर्गाचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. असे असताना या चक्रीवादळाच्या पावसाने रब्बी हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला आणि कडधान्य पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरीवर्ग व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - चोरट्याने मारला दुकानावर डल्ला, मोबाईल विसरल्याने सापडला पोलिसांच्या कचाट्यात

खरीप हंगामात भातशेतीचे आधीच नुकसान झाले आहे. आता या पावसाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामातही नुकसान होण्याची भीती शेतकरी सुगंधा जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. गेल्या २ दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पेरलेल्या रब्बी पीकातील हरभरा, मूग, वाल आणि भाजीपाला कुजला जाऊ शकतो. हे पेरलेले बियाणे वाया गेले तर शेतकरी वर्गावर दुबार पेरणीचे संकट निर्माण होईल, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा - माकप आमदाराविरुद्ध सेना आमदारांचा रंगला कबड्डी सामना

Intro:

नव्या चक्रीवादळाचा भीतीने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाला धोका- शेतकरी चिंतेत
अवकाळी पावसाने रब्बीवर
दुबार पेरणीचे संकट?

पालघर(वाडा)संतोष पाटिल

कोकणात आता नव्या चक्रीवादळाचा  धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिला त्यामुळे कोकण किनार पट्टीसह उत्तर कोकणातील पालघर जिल्हातही ढगाळ वातावरण तयार झाले आहे.या अगोदर 1 डिसेंबरला पालघर जिल्ह्यातील वाड,विक्रमगडसह, काही भागात अवकाळी पावसाच्या राञी 8 च्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर आजही 5 डिसेंबरला सायंकाळी  4 सुमारास वाडा तालुक्यासह इतर तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.या परिस्थीतीत रब्बी हंगाम घ्यायचा की नाही या चिंतेत सध्या शेतकरीवर्ग वावरत आहे.
घरात असलेले रब्बी हंगामातील बियाणे पेरलं आहे.पुन्हा संकट अवकाळी पावसाचे आहे.त्यामुळे काही दिवसांनी पेरलेलं बियाणे अती पावसाने वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
राज्यातील कोकण किनारपट्टीवर या अगोदर क्यार, महाचक्रीवादळाचा तडाखा बसला असताना आता नवे वादळ तयार होत असल्याचे सांगितले जाते.या निर्माण होणा-या चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यातील धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
आज सकाळपासून ढगाळवातावरण आणि हवेत गारवा निर्माण झाला होता. खरीप हंगामातील शेतकरीवर्गाचे नुकसान झाले असताना या चक्रीवादळाचा पावसाने रब्बी हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला आणि  कडधान्य पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकरीवर्ग व्यक्त करत आहेत.
खरीप हंगामात भातशेती नुकसान झाले आणि या पावसाच्या लहरीपणामुळे कोसळणाऱ्या पावसाने रब्बी हंगामातही  नुकसान होण्याची भीती महिला शेतकरी सुगंधा जाधव यांनी बोलताना व्यक्त केली.
दोन दिवस अवकाळी पाउस कोसळत आहे.त्यामूळे पेरलेले रब्बी पीकतील हरभरा,मूग,वाल आणि भाजीपाला कुजला जाऊ शकतो.
हे पेरलेले बियाणे वाया गेले तर शेतकरीवर्गावर दूबार पेरणीचे संकट निर्माण होईल असे त्यांनी बोलतना सांगितले.

Body:विज़ुअल पावसाचे

महिला शेतकरी
सुगंधा जाधव

Conclusion:ओके
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.