ETV Bharat / state

मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी - palghar accident news

मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
author img

By

Published : Dec 18, 2020, 3:06 PM IST

पालघर/विरार - मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विरार हद्दीतील सकवार परिसरात मुंबई लेनवर पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात घडला. जखमी व मयत हे डोंबिवली परिसरातील राहणारे आहेत.

टायर बदलण्यासाठी थांबला होता टेम्पो-

महामार्गावर टायर बदलण्यासाठी पाण्याच्या बाटल्यांनी भरलेल्या टेम्पो थांबला होता. तसेच एक रिक्षा देखील त्याठीकाणी होता. दरम्यान, मुबंईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने टेम्पो व रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विरार पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्ह्याची नोंद-

अपघात येवढा भीषण होता की कंटेनर, टेम्पो आणि रिक्षा रस्त्यावर पलटी झाले. टेम्पोतील बिसलरीच्या पाण्याच्या बॉटल रस्त्यावर पडल्या. टायर फुटल्याने बिसलरी भरुन असणारा टेम्पो मुंबई लेनवर उभा होता. पाठीमागून आलेल्या कंटेनरने टेम्पो आणि समोरील रिक्षाला उडविले. याबाबत विरार पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

हेही वाचा- धक्कादायक! राज्यात अंदाजे 40 हजार 'मुन्नाभाई एमबीबीएस' सक्रीय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.