पालघर - कोरोनाकाळात ग्रामीण भागातल्या अतिदुर्गम भागात जाऊन वाडी वस्तीमधल्या कोरोनाविषाणू प्रादुर्भाव रोखण्याचे काम आशा वर्कर्स, आरोग्य सेविकांनी मोलाचे काम केले. त्यांचा गौरव आणि सन्मान करणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ पाटील यांनी पालघर येथे आयोजित कोरोना योद्ध्यांच्या सत्काराप्रसंगी व्यक्त केले. शरद पवारांच्या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे महिला वर्गाला 50 टक्के आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे महिला जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसत आहे, असेही ते म्हणाले.
कामगिरी मोलाची
पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना येथील ग्रामीण भागातील कोरानाबाबत असलेल्या गैरसमजुतीने आशा वर्कर्स यांना अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीतही त्यांनी कोरानाचा मुकाबला केला. डॉक्टर, नर्स, पत्रकार सफाई कामगार, रुग्णवाहिकेचा चालक आदींचा यावेळी सन्मान सोहळा गारगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी रोहिदास शेलार, पंचायत समिती सदस्या पूनम पथवा, रघुनाथ माळी यांनी आयोजित केला होता.