ETV Bharat / state

गृहमंत्र्यांची गडचिंचले तिहेरी हत्याकांड घटनास्थळी भेट; पोलीस अधीक्षक सिंग यांना सक्तीच्या रजेचा आदेश - gadchinchale incident

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अचानक पालघरचा दौरा करत गडचिंचले येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनास्थळी भेट दिली. गृहमंत्र्यांनी प्रथम कासा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्यांनी गडचिंचले प्रकरणाची सखोल माहिती जाणून घेतली.

Home Minister Anil Deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख यांची गडचिंचले तिहेरी हत्याकांड घटनास्थळी भेट
author img

By

Published : May 7, 2020, 11:08 PM IST

Updated : May 8, 2020, 12:03 AM IST

पालघर - जिल्ह्यातील कथित तिहेरी हत्याकांडाती कासा पोलीस ठाण्याअंतर्गत गडचिंचले भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे गडचिंचले भागात सकाळी 11 च्या सुमारास दाखल झाले. येथे त्यांनी गावातील सरपंच व इतर लोकांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. यात पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असून, त्यांच्या कारभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावर सोपविण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी बोलताना सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची गडचिंचले तिहेरी हत्याकांड घटनास्थळी भेट

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अचानक पालघरचा दौरा करत गडचिंचले येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनास्थळी भेट दिली. गृहमंत्र्यांनी प्रथम कासा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्यांनी गडचिंचले प्रकरणाची सखोल माहिती जाणून घेतली. तसेच घटनास्थळाचे प्रत्यक्ष साक्षीदार गावातील सरपंच व जिल्हा परिषद सदस्य यांच्यासोबत चर्चा करून नेमकी घटना कशी घडली हे जाणून घेतले. यावेळी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंखे हे देखील उपस्थित होते.

घटनेच्या दिवशी घडलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती सखोलपणे अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी व घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांकडून जाणून घेतली. यावेळी त्यांच्यसमवेत खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, राजेश पाटील, पालघरचे जिल्ह्याधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक आदी उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्या प्रकरणात कासा पोलिसांनी याआधी 115 आरोपींना अटक केली असून, यातील 9 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

तिहेरी हत्याप्रकरण देशभर गाजले असून, हे प्रकरण हाताळत असताना त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास आता सीआयडी करत आहे.

Last Updated : May 8, 2020, 12:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.