ETV Bharat / state

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर पोलिसांचे केले कौतुक..! - गृहमंत्री अनिल देशमुख पालघर पोलीस

पालघर पोलीस दलाच्या कार्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे. पालघर पोलिसांच्या कार्यतत्परतेचा अभिमान वाटतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

पालघर पोलीस
पालघर पोलीस
author img

By

Published : Aug 6, 2020, 3:40 PM IST

पालघर - जिल्ह्यात मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत पावसामध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या २२ नागरिकांचा जीव वाचवण्यात पालघर पोलीस दलाला यश आले. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावरील अडथळे दूर करत वाहतूक देखील सुरळीत केली. त्यामुळे पालघर पोलीस दलाच्या या कार्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले असून पालघर पोलिसांच्या कार्यतत्परतेचा अभिमान वाटतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

पालघर पोलीस
पालघर पोलीस
पालघर जिल्ह्यात बुधवारी सरासरी २६५.४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. डहाणू तालुक्यात ४६५ मिलिमीटर, तलासरी तालुक्यात ४२३ मिलिमीटर, पालघर तालुक्यात ३८०, वाडा तालुक्यात २२२ तर वसई तालुक्यात १९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आणि विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य हाती घेण्यात आले.
पालघर पोलीस
पालघर पोलीस

अनेक ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना सोडवण्यासाठी रस्त्यावर असलेले अडथळे दूर करून पोलिसांना बचावकार्यासाठी पोहोचावे लागले. तसेच काही ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक व जनजीवन सुरळीत करण्यात पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली.

पालघर पोलीस
पालघर पोलीस
तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाडीपाडा या ठिकाणी नदीच्या पुराचे पाणी घरात शिरले आणि सात जणांचा जीव धोक्यात आला होता. केळवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत माकुणसार गावाच्या जवळ असलेल्या ब्रह्मदेव मंदिराच्याजवळ खारटन भागात एक दाम्पत्य शेतामधील घरामध्ये अडकले होते. तसेच घोलवड पोलीस ठाणे यादीमध्ये झाई व वेवजी रस्त्यावर दरड कोसळल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांचा महत्वपूर्ण वाटा होता. पालघर-माहीम रस्त्यावर साईबाबानगर येथे पुराचे पाणी वाढल्याने झाडावर अडकून बसलेल्या व्यक्तीची पोलिसांनी सुटका केली. तर सफाळे लालठाणे हद्दीत रस्त्यावर पडलेल्या माती दगडांचा ढिगारा बाजूला सारण्यात पोलिसांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला.
ट्वीट
ट्विट

संकटकाळी लोकांच्या मदतीसाठी पालघर पोलिसांनी केलेल्या कार्याची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. पालघर पोलिसांचे गृहमंत्र्यांनी कौतुक केले असून पालघर पोलिसांच्या कार्यतत्परतेचा अभिमान वाटतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.