ETV Bharat / state

...म्हणून गृहमंत्र्यांनी गडचिंचले हत्या प्रकरणातील आरोपींची जाहीर केली यादी

author img

By

Published : Apr 22, 2020, 12:58 PM IST

संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढतोय. अशातच जातीचे राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोपही देशमुख यांनी केला, अशा लोकांसाठी गृहमंत्र्यांनी आरोपींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकाही मुस्लीम व्यक्तीचे नाव नसल्याचे दिसून येत आ

home minister anil deshmukh  palghar murder case accuse list  gachinchle murder case accuse list  गडचिंचले हत्या प्रकरणातील आरोपींची यादी  गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख

पालघर - गडचिंचले हत्या प्रकरणातील आरोपींची यादी गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. काहीजण या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे १०१ आरोपींची यादी जाहीर करत आहोत. यामध्ये कुठल्याही मुस्लीम व्यक्तीचा समावेश नाही. त्यामुळे सर्वांनी ही यादी पाहावी आणि घटनेला धार्मिक रंग देणे थांबवावे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

  • पालघर की घटना में पुलिस हिरासत हुए १०१ लोगों की सूची यहाँ सांझा की जा रही है। जो विघ्नसंतोषी इस घटना को धार्मिक रंग देने की पूरी कोशिश कर रहे थे, वह इसे ध्यानपूर्वक पढ़ें...#ZeroToleranceForCommunalism#LawAndOrderAboveAll pic.twitter.com/o70b2YNHQq

    — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

व्हिडिओमध्ये ओय बस...ओय बस...असा आवाज होता. मात्र, काहींनी त्याचा विपर्यास केला. त्याचा अर्थ शोएब बस...शोएब बस, असा घेण्यात आला. त्यावरून या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढतोय. अशातच जातीचे राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोपही देशमुख यांनी केला. अशा लोकांसाठी गृहमंत्र्यांनी आरोपींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकाही मुस्लीम व्यक्तीचे नाव नसल्याचे दिसून येत आहे.

home minister anil deshmukh  palghar murder case accuse list  gachinchle murder case accuse list  गडचिंचले हत्या प्रकरणातील आरोपींची यादी  गृहमंत्री अनिल देशमुख
गडचिंचले हत्या प्रकरणातील आरोपींची यादी

काय आहे गडचिंचले हत्या प्रकरण -

गेल्या १६ तारखेला रात्री दोन व्यक्ती चारचाकीने गुजरातमध्ये जात होते. त्यांची दादरा-नगर हवेली आणि पालघरच्या सीमेवर गडचिंगले हे गाव आहे. या गावात अनेक दिवसांपासून चोर येऊन मुले पळवतात, अशी अफवा आहे. त्यामुळे त्यांनी या व्यक्तींसह त्यांच्या चालकाला चोर समजून त्यांची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी पहाटे ५ वाजतापासून जंगलात आरोपींचा शोध घेतला. यामध्ये १०१ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये ९ आरोपी १८ वर्षांखालील असून त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, तर अन्य १०१ आरोपींना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला असून आणखी आरोपींना शोध तपास यंत्रणा आणि पोलीस घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.