ETV Bharat / state

वाडा तालुक्यात ३ दिवसाच्या कोसळधारेने पूरसदृश्य स्थिती; शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

अशीच कोसळधार कायम राहिल्यास शेती कामांचा खोळंबा होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

वाडा तालुक्यात ३ दिवसाच्या कोसळधारेने पूरसदृश्य स्थिती; शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
author img

By

Published : Jul 1, 2019, 12:04 PM IST

पालघर (वाडा) - गेल्या ३ दिवस संततधार कोसळत असल्यामुळे वाडा तालुक्यात सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशीच कोसळधार कायम राहिल्यास शेती कामांचा खोळंबा होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

वाडा तालुक्यात ३ दिवसाच्या कोसळधारेने पूरसदृश्य स्थिती; शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

वाडा तालुक्यात ३ दिवस रिमझिम पावसाने सुरुवात होऊन २ दिवस मोठ्या कोसळधारेने शेतजमिनीत पुरपरिस्थिती निर्माण केली आहे. शेतजमिनीत काही दिवसांनी पेरलेले भात पीकही पाण्याखाली आले होते. वाडा तालुका व विक्रमगड हद्दीला लागून असलेली देहेर्जे नदी येथील ब्राह्मणगाव येथील कमी उंचीचे पुल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

काही नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन गोऱ्हा-कंचाड ही रस्ते वाहतुकीवर दुपारच्या वेळी काही काळ ठप्प झाली होती. सर्वत्र पावसाने जोरदारपणे संततधार पकडल्याने जनसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. ही कोसळधार अशीच कायम राहिल्यास पालघर जिल्ह्यासह वाड्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:तीन दिवसाच्या कोसळधारेने पुरपरिस्थितीची व शेती कामे खोळंबण्याची भीती.
पालघर (वाडा) -संतोष पाटील
वाडा तालुक्यात तीन दिवस संततधार कोसळत असल्यामुळे तालुक्यात सर्वञ पुरसदृश्य परिस्थिती पहायला मिळतेय.अशीच कोसळधार कायम राहिल्यास पुरपरिस्थिती निर्माण होईल आणि शेती कामे खोळंबा होऊ शकतील असे भीती शेतकरी व्यक्त करतात.
वाडा तालुक्यात तीन दिवस रिमझिम पावसाने सुरूवात करताना दोन दिवस मोठ्या कोसळधारेने शेतजमिनीत पुरपरिस्थिती निर्माण केली . शेतजमीनीत काही दिवसांनी पेरलेले भात पिक ही पाण्याखाली आले होते.वाडा तालुका व विक्रमगड हद्दीला लागून असलेली देहेर्जे नदी येथील ब्राह्मणगांव येथील कमी उंचीचेपुल पाण्याखाली गेल्याने तेथील काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
काही नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन गो-हा -कंचाड ही रस्ते वाहतुकीवर दुपारच्या वेळी काही काळ ठप्प झाली होती.
सर्वञ पावसाने जोरदारपणे संततधार पकडल्याने जनसामान्यांच्या जनजीवन विस्कळीत झाले होते.
ही कोसळधार अशीच कायम राहिल्यास पालघर जिल्ह्यासह वाड्यात पुरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि शेती कामाचा खोळंबा होईल असे शेतकरी आपली भावना व्यक्त करतात.Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.