पालघर - शुक्रवारपासून पालघर परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने मुसंडी मारली आहे. हा पाऊस रात्रभर सुरुच राहिला. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर आणखी वाढला आहे. या आधीच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. पावसाची तीव्रता आता वाढण्याची शक्यता असून सध्या 45 किमी प्रति तास वारे वाहत आहेत. साधारण 10.30 सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा वेग 50kms/hr हुन अधिक राहण्याची शक्यता आहे .
सारवली, उमरोळी, माकुणसार, डहाणू येथे सखल भागात पाणी साचयला सुरुवात झाली आहे. या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. बोईसर,सरावली, रेवाळे आदी ठिकाणी झाडे उमळून पडल्याने वाहतूक बंद आहे. समुद्रात भरती दरम्यान दुपारी 2.35 च्या सुमारास 5.88 मीटरच्या लाटा सातपाटी व किनारी भागात उसळण्याची शक्यता असून खोलगट भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.