पालघर- येथे रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पालघर, बोईसर, साफळे, डहाणू, बोर्डी या भागातही जोरदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. या पावसामुळे बोईसर-हरमुनी चित्रलय रस्ता, पालघर येथील ट्विंकल स्टार हायस्कुल, स्टार हाईस्कुल परिसर, माकुणसार, डहाणू इराणी रोड, स्टेशन रोड, चंद्रिका हॉटेल जवळ पाणी साचले आहे.
मनोरवाडा महामार्गावरील वरले गावाजवळ अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा उशिराने सुरू आहेत. उपनगरीय लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. पालघर मधील काही खासगी शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे. तर आज दुपारी समुद्राला मोठी भरती असल्याने सातपाटी, डहाणू खाडी या भागात पाणी शिरण्याची भीती आहे.