पालघर - वाघाडी येथील भीमबांध येथे अंघोळीसाठी सूर्या नदीत गेलेली एक मुलगी बुडाली. ही घटना आज शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली. तिच्यासोबत असलेल्या इतर दोन मुलींना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. उजा दीपक गवई (१६) रा पिंपरी, जिल्हा बुलढाणा असे बेपत्ता मुलीचे नाव आहे.
उजा आणि तिच्या दोन मैत्रिणी अंघोळीसाठी नदीच्या पाण्यात उतरल्या होत्या. पंरतु, पाण्याचा अंदाज न आल्याने उजा बुडायला लागली. यावेळी तिला वाचविण्यासाठी तिच्या मैत्रिणी पाण्यात उतरल्या असता, त्याही बुडायला लागल्या. मात्र, त्यांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. मृत उजा गवई हिचा स्थानिकांच्या मदतीने शोध सुरू आहे. ही घटना कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली.