पालघर - पालघर जिल्ह्यात लाडक्या गणरायाला भावपूर्ण भक्तिभावाने निरोप दिला गेला. जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, डहाणू, तलासरी, पालघर, मोखाडा आणि वसई या भागातील घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या गणेश भक्तांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. नदी, नाले, तलावात या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
गणेशोत्सवादरम्यान विविध कार्यक्रम तसेच भक्तीसंगीताचे कार्यक्रम आयोजित करून हा गणेशोत्सव साजरा केला गेला. पालघर जिल्ह्यात मुसळधार जोरदार वाऱ्यासह पावसाची संततधार चालू आहे. गणेश भक्ताने उत्साहाने गणरायाला निरोप दिला.