पालघर - विरारमधील चंदनसार येथील 'क्लासिक फर्निचर' या दुकानाला काल (रविवार) रात्री भीषण आग लागली. या आगीत दुकानातील सर्व फर्निचर जळून खाक झाले आहे. फटाक्याच्या ठिणगीने ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.
रात्री १०.३० च्या सुमारास ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.
हेही वाचा : ऐन दिवाळीत प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग, बाजूची चार दुकानेही भस्मसात