ETV Bharat / state

प्रलंबित वनहक्क दावे नियमित करण्यासह विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा मोर्चा

आदिवासी समाजाचे प्रलंबित वनहक्क दावे नियमित करण्यासह विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने मोर्चा काढला आहे. भारतीय वन कायदा (सुधारणा )२०१९ रद्द करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा मोर्चा
author img

By

Published : May 13, 2019, 3:51 PM IST

वाडा - आदिवासी समाजाचे प्रलंबित वनहक्क दावे नियमित करण्यासह विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने मोर्चा काढला आहे. फॉरेस्ट खात्यातील कामाच्या मजुरीचे पैसे मागणाऱ्या मजुरावर बंदुकीच्या धाक दाखविणाऱ्या वाडा वनक्षेत्रपाल दिलीप तोंडे यांच्यावर कारवाई करा आणि जंगलातील वनवासी जनतेच्या हक्कावर गदा आणणारा भारतीय वन कायदा (सुधारणा )२०१९ रद्द करण्यात यावा अशा विविध मागण्या करत वाडा प्रांत कार्यालयासमोर हा मोर्चा काढण्यात आला.

विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा मोर्चा

वाडा तालुक्यातील अबिटघर येथील मजूर २३ एप्रिल २०१९ ला वनक्षेत्रपाल दिलीप तोंडे यांच्या कार्यालयात आपली मजुरी मागणीसाठी गेले असता त्यांना तोंडे यांनी दमदाटी करत पिस्तूल रोखल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेकडून केला गेला आहे. अशा अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. तसेच फॉरेस्ट खात्यात आदिवासी समाजाने दाखल केलेले प्रलंबित दावे मंजुरीस आणून ते नावे करून सिंचन आणि वीज सुविधा पुरविण्यात यावी. यासोबतच घरकुल घरबांधणीकरीता ५ ब्रास रेती आणण्याची सवलत द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी वाडा प्रांत कार्यालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Intro:Body:

ENT 09

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.