पालघर - अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहम्मद अली शेख हत्याप्रकरणात स्मिता शेट्टी या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याआधी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. आरिफ मोहमद अली यांची अपहरणकर्त्यांकडून जाळून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. चारही आरोपींना पालघर सत्र न्यायालयाने 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पालघरमधील अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहम्मद अली शेख यांचे 9 मे रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून त्यांची जाळून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर चौथी आरोपी स्मिता शेट्टी या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिलाही या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे.
या खून प्रकरणात आणखी चार ते पाच आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.