ETV Bharat / state

हे तिघाडी सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालतंय - माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

हे सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालते, असा आरोप माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर केला. त्याचप्रमाणे लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असताना हे सरकार दडपशाही करते. 10 ते 12 हजारांचा जमाव येथे जमणार होता. मात्र, कोरोनाचे कारण दाखवत कार्यकर्त्यांना अडवण्यात आले.

पालघर
पालघर
author img

By

Published : Nov 21, 2020, 3:59 PM IST

पालघर - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज भाजपकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावाचे कारण देऊन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. अनेकदा तक्रारी करूनही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही.

हे सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालते, असा आरोप माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर केला. त्याचप्रमाणे लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असताना हे सरकार दडपशाही करते. 10 ते 12 हजारांचा जमाव येथे जमणार होता. मात्र, कोरोनाचे कारण दाखवत कार्यकर्त्यांना अडवण्यात आले. त्यांना दिटेन करण्यात आले. इतरत्र आघाडी सरकारमधील पक्ष हे आंदोलन करतात, मात्र इथे दडपशाही करण्यात आली, असे आमदार संजय केळकर यांनी पालघर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषदेमधील भ्रष्टाचार

जिल्ह्यातील नगरपंचायती वाडा, विक्रमगड, डहाणू नगरपरिषद मधील भ्रष्टाचार, कुपोषण समस्या, खावटी योजना वाटप, शेतकरी वर्गाला 50 हजार हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, भूकंपबाधित नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, स्थानिकांना नोकरी, आदी विविध मागण्यासाठी आज आंदोलन करण्यात येणार होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करताना आमदार निरंजन डावखरे,आमदार संजय केळकर ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, आदी मान्यवरांसह जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, सरचिटणीस संतोष जनाठे उपस्थित होते.

कार्यकर्त्यांची धरपकड आणि मोर्चा होणारच भाजपचा निर्धार

हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना पोलिसांनी मनाई आदेश नोटिसा बजावल्या होत्या आणि धरपकड सुरू करून पोलीस ठाण्यात आणले. मात्र, कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून जसे जमेल तसे या असे आवाहन करण्यात आले. मोर्चा होणारच असे सांगून अखेर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.