पालघर - जिल्ह्यातील सफाळे येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत मोटारसायकल पार्किंगमधील तब्बल 7 मोटरसायकल जळून खाक झाल्या आहेत. तर अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे.
सफाळे येथील शिव मेडिकल समोरील पार्किंगमध्ये ही आग लागली. या आगीत पार्किंगमधील 7 मोटारसायकल जाळून खाक झाल्या आहेत. याबाबत अधिक तपास सफाळे पोलीस करत आहेत.