पालघर(विरार) - गुरुवारी रात्री आयसीआयसीआय बँकेवर टाकलेल्या सशस्त्र दरोड्यातील आरोपीवर नायगावच्या अॅक्सिस बँकेचीही फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
विरारच्या आयसीआयसीआय बँकेत दरोडा व हत्या केल्याप्रकरणी अटक असलेला माजी मॅनेजर आरोपी अनिल दुबे यावर वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेत दरोडा टाकण्याआधी हा आरोपी गेल्या एक ते दीड वर्षांपासून नायगावच्या अॅक्सिस बँकेत ब्रांच मॅनेजर या पदावर कार्यरत होता. दरम्यान, कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा डोंगर त्याच्या डोक्यावर असल्याने त्याने दरोडा टाकण्याचा प्लॅन करून नष्ट करण्याचा हेतूने बँकेतील महिला कर्मचाऱ्याची हत्या केली होती.
आरोपीने अॅक्सिस बँकेलाही लावला चुना -
दरम्यान, या आरोपीने अॅक्सिस बँकेलाही चुना लावल्याचे उघड झाले आहे. बँकेत जमा झालेल्या २६ लाख ८६ हजार रुपायांचा अपहार केल्याची तक्रार बँकेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. वालीव पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात असल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. कारंडे यांनी दिली आहे.