पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासामध्ये ५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या ५० कोरोना रुग्णांपैकी ३६ रुग्ण पालघर तालुक्यातील, ७ डहाणू तालुक्यातील व ७ वाडा तालुक्यातील आहेत. वसई ग्रामीण भागातील एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ हजार ५९२ इतकी झाली असून, २० रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १ हजार ४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ५२३ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती -
राज्यात शुक्रवारी 6 हजार 875 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 30 हजार 599 अशी झाली आहे. नवीन 4 हजार 67 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लाक 27 हजार 259 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 93 हजार 652 सक्रिय रुग्ण आहेत.