ETV Bharat / state

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; फ्रान्सिस दिब्रिटो यांची विशेष मुलाखत

author img

By

Published : Jan 7, 2020, 5:24 PM IST

Updated : Jan 10, 2020, 11:00 AM IST

या वर्षी 12 जानेवारीला उस्मानाबादमध्ये 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची सर्वप्रथम 'ईटीव्ही भारत'ने घेतलेली विशेष मुलाखत...

father francis dibrito interview
अखिल भारतीय मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची 'ईटीव्ही भारत'ने घेतलेली खास मुलाखत...

उस्मानाबाद - या वर्षी 12 जानेवारीला उस्मानाबादमध्ये 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची 'ईटीव्ही भारत'ने घेतलेली खास मुलाखत...

अध्यक्षपदाच्या वादावर सोडले मौन...

फादर दिब्रिटो यांच्या अध्यपदाच्या निवडीवरुन अनेक वाद झाले होते. यावर बोलताना, माझी भूमिका संवादाची असल्याचे ते म्हणाले. वाद मिटवण्यासाठी संवादच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गैरसमजातून या घटना घडत असल्याचेही अध्यक्षांनी सांगितले.

भाग १

सद्या देशातील परिस्थिती चिंताजनक ?

रविंद्रनाथ टागोरांनी गीतांजलीमधून 'भारत भयमुक्त असावा' असे स्वप्न रचले होते. सध्याच्या परिस्थितीत भारतातील लोक भयमुक्त आहेत का, याचा विचार व्हायला हवा, असे दिब्रिटो म्हणाले.
देशातील सध्याचे वातावरण चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता देशभक्त असून चालत नाही, तर देशभक्त असणे सिद्ध करावे लागते, असे ते म्हणाले. यामुळेच अध्यक्षपदाचे नाही, तर साहित्यबाह्य घटकांचे दडपण असल्याचे फादर यांनी सांगितले.

भाग २

माझी माय मराठी...

आईच्या मांडीत पहिल्यांदा मराठीचे संस्कार झाल्याचे फ्रान्सिस यांनी सांगितले. तसेच मी मराठीच्या कडेवर बसून मराठी शिकलोयं, असे ते म्हणाले. लहानपणापासून मराठी पुस्तकं वाचण्याची सवय आणि घरातून मिळालेलं पोषक वातावरण,यामुळे भाषेचा संस्कार झाला, असे त्यांनी सांगितले. तसेच वि.स. खांडेकरांच्या 'ययाती' कादंबरीने वाचनाला वळण दिल्याचे त्यांनी म्हटले.

भाग ३

ख्रिस्त धर्म आणि मराठीची सांगड...

मराठी आणि ख्रिस्ती धर्माचा याचा संदर्भ देताना, फादर थॉमस स्टिफन्स यांचा उल्लेख त्यचांनी केला. हे ब्रिटीश गृहस्थ भारतात आले. कोकणी आणि मराठीचा अभ्यास करुन त्यांनी 'भाषा माझी साजरी' नावाचं मराठी गौरवगीत लिहिल्याची माहिती दिब्रिटो यांनी दिली.

भाग ४

यानंतर नारायण वामन टिळक यांचे भाषा संस्कार झाले. 'तुका नामत सेतू;आलो ख्रिस्त चरणी' असे अभंग टिळकांनी पाठ करुन घेतले. तसेच टिळकांनी आम्हाला ख्रिस्ती धर्माचं मराठमोळं स्वरुप शिकवले, असे ते म्हणाले. आम्ही पहिल्यांदा ख्रिस्ताला 'माऊली' हाक मरली; ते टिळकांच्या प्रभावामुळेच असे दिब्रिटो यांनी सांगितले.

भाग ५

जेव्हा मी संपादक होतो...

सुवार्ता नियतकालीकाच्या संपादक पदाची जबाबदारी आल्यानंतर व्यापक भूमिका ठेवल्याने सर्वांनाच त्यातील वाचन जवळचे वाटले, असे फादर म्हणाले. मी संपादक असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.गो.वैद्य यांनी देखील 'राष्ट्रीयत्व हे भारतीयत्व आहे का', यावर लेख लिहिल्याची आठवण त्यांनी करुन दिली. पु.ल देशपांडेंनी देखील लेख लिहिल्याचे फादर दिब्रिटो यांनी सांगितले. याचसोबत साहित्य संमेलन देखील भरवले. तसेच व्याख्यानमाला आणि साहित्यमेळाव्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे ते म्हणाले.

पर्यावरणासाठी लढलो म्हणूनच वसई हिरवीगार...

हरित कृषी संरक्षण समितीमार्फत लोकांची चळवळ उभी केली. यामार्फत वसईतील पर्यावरणाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. तसेच सिडकोच्या प्रकल्पाला विरोध केल्यानेच आज वसई हिरवीगार राहिल्याचे फादर दिब्रिटो यांनी सांगितले.

मी आणि तुकाराम...

तुकाराम आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे अन्यायाविरुद्ध बोलण्याची शिकवण तुकाराम आणि ख्रिस्ताची सारखीच असल्याचे दिब्रिटो यांनी सांगितले. दोघांचीही अन्यायाविरुद्ध कोणतीही किंमत मोजण्याची तयारी होती. प्रस्थापितांविरोधात तुकाराम महाराज आणि ख्रिस्ताने कायमच आवाज उठवला असे ते म्हणाले.

मराठी साहित्य आणि आजची पिढी...

व्हिज्युअल माध्यमांमध्ये आजकालची पिढी अडकून पडल्याने त्यांच्याकडे पुस्तकं वाचण्यासाठी वेळ नाही, असे ते म्हणाले. तसेच पींड घडण्यासाठी ही माध्यमे असक्षम असून ट्युशन संस्कृतीने मुलांच्या विचारक्षमतेवर परिणाम केला आहे, असे मत त्यांनी मांडले. अनेक तरुणांना भाषेची ओढ आहे. परंतु नुसती ओढ असून चालत नाही; ओढ जोपासावी लागते, असा सल्ला फादर दिब्रिटो यांनी दिलायं.

Last Updated : Jan 10, 2020, 11:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.