पालघर - कोरोना व्हायरसमुळे राज्यभरात अनेक ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. यामुळे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व उत्सव, यात्रा, कार्यक्रम रद्द केले आहेत. कोल्हापूर, पुणे, मुंबईसह सर्व शहरातील मोठ्या देवस्थानामध्ये प्रथमच देवदर्शनला बंदी घालण्यात आली आहे. अशा सर्व परिस्थितीत झेंडूच्या फुलांना ग्राहक नाही. त्यामुळे वाडा तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांवर ट्रक्टर फिरवला आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गातेस या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड करतात. त्याबरोबरच गावातील शेतकऱ्यांनी 8 लाख झेंडूची लागवड केली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झेंडूला मार्केट नसल्यामुळे झेंडू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर झेंडू नष्ट करण्याची वेळ आली आहे. तर या शेतकऱ्यांना झेंडूची लागवड करण्यासाठी जेवढ खर्च झाला होता, तोही निघाला नसल्यामुळे सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.