ETV Bharat / state

वसईत औद्योगिक कंपनीतल्या बॅायलरचा भीषण स्फोट, 1 ठार, 3 गंभीर

author img

By

Published : Aug 8, 2021, 12:23 PM IST

वसईत औद्योगिक कंपनीतल्या बॅायलरचा भीषण स्फोट १ कामगार ठार तर ३ जण गंभीर जखमी नेमुद्दीन सलमानी १८ असं मयत तरुणाचे नाव आहे जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी वलीव पोलीस ठाण्यात कंपनी मालकाविरोधात निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॅायलरचा भीषण स्फोट
बॅायलरचा भीषण स्फोट

पालघर/वसई : - वसई पूर्व मुंबई अहमदाबाद महामार्गाशेजारी असलेल्या औद्योगिक वसाहतीत शनिवारी एका कंपनीतील बॅायलरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या भीषण स्फोटात कंपनीत काम करत असलेला एक कामगार जागीच ठार झाला, तर इतर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. नेमुद्दीन सलमानी (१८)असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्फोटातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बॅायलरचा भीषण स्फोट

शनिवारी सायंकाळच्या सुमारास तुंगारेश्वर फाट्याजवळ असलेल्या हेफ्ट इंजिनीअरिंग कंपनीत हा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची भीषणता इतकी भयानक होती की स्फोटाच्या हादऱ्याने बाजूच्या कंपनीच्या भीतीलादेखील मोठे भगदाड पडले आहे. तसेच स्फोटात कंपनीतील मशिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर स्फोट झाला त्यावेळी कंपनीमध्ये पावडर कोटिंगचे काम करत असलेल्या नेमुद्दीन सलमानी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 3 कामगार जखमी झाले.

स्फोटामुळे परिसरातील इतर कंपन्यांचेही नुकसान झाले आहे. मात्र, स्फोट झालेल्या कंपनीकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने काळजी घेण्यात न आल्याने कंपनी मालकावर निष्काळजीपणाचे ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या घटनेची नोंद वालीव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून कंपनी मालकाविरोधात निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.