ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यातील आठ शिक्षक 'जिल्हा आदर्श शिक्षक' पुरस्कारने सन्मानित - palghar z p

पालघर जिल्ह्यातील आठ शिक्षकांना शिक्षण क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराने गौैरविण्यात आले.

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारने सन्मानित
author img

By

Published : Sep 5, 2019, 8:54 PM IST

पालघर - जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे एकूण आठ शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हा परिषद पालघर शिक्षण विभागातर्फे जिल्हा आदर्श शिक्षण पुरस्कार सोहळा गुरुवारी आनंदाश्रम इंग्लिश हायस्कुल, पालघर येथे आयोजित करण्यात आला होता.

कुंदबाला पाटील (वसई), भगवान शिंदे (मोखाडा), सुहास सुतार (तलासरी), विलास भुरभूरे (विक्रमगड), मधुकर भोये (जव्हार), सुरेश भोये (डहाणू), रोशनी भोईर (वाडा), स्वेजल म्हात्रे (पालघर) या आठ शिक्षकांना यावेळी रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

शिक्षक हे समाजासाठी आदर्श असून, सामाजिक दायित्व, सामाजिक मूल्ये जपण्याचे काम करत असतात. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी विना अट लागू करावी. तसेच इतर जिल्ह्यात मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांची पदोन्नती झालेली आहे. पालघरमध्ये ही पदोन्नती अद्याप झाली नसून यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी याप्रसंगी सांगितले. पालघर जिल्ह्यात शिक्षक कमी असूनही आपण आपल्या कार्यात उत्कृष्ट कार्य करता याबद्दल अध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे. तसेच हा सत्कार केवळ आठ शिक्षकांचा नसून जिल्ह्यातील सात हजार शिक्षकांचा सत्कार आहे. जिल्ह्याला प्रगतीकडे नेणे तुमच्या हातात आहे असे मत यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांनी व्यक्त केले.

इंटरनेटच्या युगात आज कुठलीही माहिती उपलब्ध होते. मात्र ज्ञान देण्याचे व कौशल्य वाढविण्याचे, संस्कार करण्याचे काम हे केवळ शाळांमधूनच होऊ शकते. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची भूमिका खूप कौतुकास्पद असून त्यांनी जिल्हा परिषद शिक्षकांनी आपली सामाजिक भान जपून शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे या शाळांतील पटसंख्या वाढत आहे. त्याच बरोबरीने शिक्षकांची जबाबदारी देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचे मत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे यांनी यावेळी व्यक्त केले व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती धनश्री चौधरी, समाज कल्याण सभापती दर्शना दुमाडा, जि.प.सदस्य प्रकाश निकम, जि.प.सदस्य चित्रा किणी, पंचायत समिती सभापती मनीषा पिंपळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जयवन्त खोत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लता सानप आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Intro:पालघर जिल्ह्यातील आठ शिक्षक 'जिल्हा आदर्श शिक्षक' पुरस्कारने सन्मानितBody: पालघर जिल्ह्यातील आठ शिक्षक 'जिल्हा आदर्श शिक्षक' पुरस्कारने सन्मानित

नमित पाटील,
पालघर, दि.5/8/2019

      जिल्हा परिषद पालघर शिक्षण विभागातर्फे जिल्हा आदर्श शिक्षण पुरस्कार सोहळा आज आनंदाश्रम इंग्लिश हायस्कुल, पालघर येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे एकूण  आठ शिक्षकांना जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले. कुंदबाला पाटील (वसई), भगवान शिद (  मोखाडा), सुहास सुतार (तलासरी), विलास भुरभूरे (विक्रमगड), मधुकर भोये (जव्हार), सुरेश  भोये (डहाणू), रोशनी भोईर (वाडा), स्वेजल म्हात्रे (पालघर) या आठ शिक्षकांना यावेळी रोख रक्कम, सन्मानचिन्ह  देऊन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

       शिक्षक हे समाजासाठी आदर्श असून, सामाजिक दायित्व, सामाजिक मूल्ये जपण्याचे काम शिक्षकांकडे आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना  निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी विना अट लागू करावी. तसेच इतर जिल्ह्यात मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांची पदोन्नती झालेली आहे. पालघरमध्ये ही पदोन्नती अद्याप झाली नसून यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी याप्रसंगी सांगितले.

     पालघर जिल्ह्यात शिक्षक कमी असूनही आपण आपल्या कार्यात उत्कृष्ट कार्य करता याबद्दल अध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे, तसेच हा सत्कार केवळ आठ शिक्षकांचा नसून जिल्ह्यातील सात हजार शिक्षकांचा सत्कार आहे. जिल्ह्याला प्रगतीकडे नेणे तुमच्या हातात आहे असे मत यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांनी व्यक्त केले. 

     इंटरनेटच्या युगात आज कुठलीही माहिती उपलब्ध होते, मात्र ज्ञान देण्याचे व कौशल्य वाढविण्याचे, संस्कार करण्याचे काम हे केवळ शाळांमधूनच होऊ शकते. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची भूमिका खूप कौतुकास्पद असून त्यांनी जिल्हा परिषद शिक्षकांनी आपली सामाजिक भान जपून शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट  कार्यामुळे या शाळांतील पटसंख्या वाढत आहे. त्याच बरोबरीने शिक्षकांची जबाबदारी देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचे मत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे यांनी यावेळी व्यक्त केले व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

    याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती धनश्री चौधरी, समाज कल्याण सभापती दर्शना दुमाडा, जि.प.सदस्य प्रकाश निकम, जि.प.सदस्य चित्रा किणी, पंचायत समिती सभापती मनीषा पिंपळे,  शिक्षणाधिकारी(माध्यमिक) जयवन्त खोत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लता सानप आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.