ETV Bharat / state

डहाणू-तलासरी परिसरात बसला 3.5 रीश्‍टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

author img

By

Published : Sep 7, 2020, 10:01 AM IST

डहाणू, तलासरी परिसरात भूकंप धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात पुन्हा भुकंपाचे धक्के जाणवायला लागले आहेत. शुक्रवारी 2.8, 3.6 व 4.0 रीश्‍टर स्केल तीव्रतेचे तीन धक्के बसले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे या परिसरातील अनेक घराचे मोठे नुकसान झाले आहे.

Earthquake in Dahanu-Talasari area of palghar district
पालघर भूकंप

पालघर - जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात आज सकाळी 8 वाजून 7 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.5 रीश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. डहाणू, कासा, धुंदलवाडी आणि तलासरी परिसराला हा धक्का जाणवला आहे.

डहाणू, तलासरी परिसरात भूकंप धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात पुन्हा भुकंपाचे धक्के जाणवायला लागले आहेत. शुक्रवारी 2.8, 3.6 व 4.0 रीश्‍टर स्केल तीव्रतेचे तीन धक्के बसले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे या परिसरातील अनेक घराचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आज सकाळी पुन्हा 8.05 वाजता 3.5 रीश्‍टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही. मात्र, पुन्हा एकदा सुरू झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांच्या सत्रांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.