पालघर - बोईसर येथील गणेश नगरमध्ये दीड वर्षांपासून बंद असलेल्या खोलीत एका प्लास्टिक ड्रममध्ये महिलेचा सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोईसर येथील गणेश नगर परिसरात लोकेश जैन यांच्या मालकीची चाळ असून चाळीतील 26 क्रमांकाच्या खोलीत पाच जणांचे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून भाड्याने राहत होते. हे कुटुंब फेब्रुवारी, 2019 पासून आपल्या गावी बिहारला गेले, मात्र, गावी गेले असताना देखील बोईसर मधील बंद असलेल्या खोलीचे घरभाडे नियमित मालकाला दिले जात होते. तीन महिन्यांचे भाडे थकल्याने नवीन भाडेकरूला खोली भाड्याने देण्यासाठी जैन यांनी खोलीचे टाळे उघडले. टाळे उघडून आता प्रवेश करताच मोठ्या प्रमाणात आलेेल्या दुर्गंधीमुळे त्यांनी घराची तपासणी केली असता शौचालयावर ठेवलेल्या प्लास्टिक ड्रममध्ये महिलेचा सांगाडा आढळून आला. या घटनेमुळे बोईसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून बोईसर पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी बिहार येथे गेले आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे बोइसर पोलिसांनी सांगितले आहे.
बोईसर : चाळीच्या बंद खोलीत ड्रममध्ये आढळला मृत महिलेचा सांगाडा - पालघर गुन्हे बातमी
बोईसरमधील गणेश नगर येथील एका चाळीतील खोलीत प्लास्टिकच्या ड्रममध्ये एका महिलेचा सांगाडा आढळला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस याचा तपास करत आहेत.