ETV Bharat / state

वाळत घातलेले मासे अवकाळी पावसात भिजल्याने मच्छिमारांचे नुकसान - Palghar District Latest News

पालघर व आसपासच्या परिसरात शुक्रवारी पहाटेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने मच्छिमारांनी सुकण्यासाठी वाळत घातलेली मच्छी भिजल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीबाबत त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

Damage to fishermen due to unseasonal rains
अवकाळी पावसामुळे मच्छिमारांचे नुकसान
author img

By

Published : Dec 11, 2020, 7:05 PM IST

पालघर - पालघर व आसपासच्या परिसरात शुक्रवारी पहाटेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने मच्छिमारांनी सुकण्यासाठी वाळत घातलेली मच्छी भिजल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीबाबत त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

बांबू 'वरणी' वर सुकण्यासाठी ठेवण्यात येतात मासे

मासेमारी करायला समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांकडून लहान-मोठे मासेविक्रेते टोपलीच्या भावाने मासे विकत घेतात. एक विक्रेता साधारण दीड- दोन हजारांचे मासे विकत घेतो. हे मासे प्रकारानुसार वेगवेगळे करून रात्रभर बर्फात ठेवले जातात आणि सकाळी ६-७ वाजता समुद्रकिना-यावरच्या बांबूंच्या ‘वरणी’वर सुकवण्यासाठी ठेवतात. काही दिवसांनी मासे सुकले की पुढे वर्षभर ते टिकतात आणि कधीही विकता येतात. बोंबील, मांदेली, कोलबी, सुकट, करंदी, लहान पालेट, वाकटी-पाट्या, लहान शिंगाडा असे सर्वच मासे सुकवले जातात. अर्थात, बोंबलाचे प्रमाण त्यात सर्वाधिक असते.

मासे अवकाळी पावसात भिजल्याने मच्छिमारांचे नुकसान

वाळत घातलेली मच्छि पावसात भिजल्याने मच्छिमारांचे नुकसान

पालघर जिल्ह्याला समृद्ध असा सागरी किनारा लाभला असून, अनेक मच्छीमार बांधव ओली मासळी वाळवून ती सुकल्यानंतर त्याची विक्री करतात. तसेच इत मासे विक्रेतेदेखील ओली मासळी विकत घेतात आणि ती वाळवून सुकी मासळी विक्री करून उदरनिर्वाह करतात. मात्र, आज पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे वाळत घातलेले मासे पावसाच्या पाण्यात भिजल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसान भरपाईची मागणी

सुकण्यासाठी वाळत घातलेली मच्छी पावसात भिजल्याने मच्छीमारांचे नुकसान झाले असून, याबाबत शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.