पालघर - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू केल्याने पोलीस बंदोबस्तावर तैनात आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या खाण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मदतील गुन्हे शाखेच्या रणरागिणी धाऊन आल्या आहेत.
राज्यातील पोलीस प्रशासन आपले कर्तव्य चोख बजावताना दिसत आहेत. दिवस-रात्र रस्त्यांवर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पालघरमधील पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी जाऊन पाणी आणि बिस्कीट वाटप केले. एकूणच राज्यात कडेकोट बंद असताना पोलीस प्रशासनातील कर्मचारी उन्हातान्हात आपले कर्तव्य बजावतात. मात्र आशा वेळी कर्मचाऱ्यांचे खाण्यापिण्याचे मोठे हाल होतात त्यांच्या सहकारी महिलांनी बिस्कीट आणि पाण्याचे वाटप करत एक अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.