ETV Bharat / state

गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांच्या आवळल्या मुसक्या; पाच किलो गांजा जप्त - latest hemp smuggler news

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून एक तस्कर नालासोपारा येथे गांजा विक्री करण्यास घेऊन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला.

palghar
गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेले गांजा तस्कर
author img

By

Published : Aug 24, 2020, 5:05 PM IST

पालघर - स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने गांजा विक्री करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किमतीचा 5 किलो गांजा गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून एक तस्कर नालासोपारा येथे गांजा विक्री करण्यास घेऊन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार कारवाई करून गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. सुनील सुभाष पवार (वय 32), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचा 5 किलो गांजा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

आरोपीविरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 च्या कलम 8 (क) 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपीची रिमांड घेऊन चौकशी केली असता, अंमली पदार्थ विक्री करणारे सुरेश अशोक काळे (वय 26) व सुभान हैदर शेख (वय 32) या आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.