ETV Bharat / state

पालघर ग्रामीणमध्ये आढळले 75 कोरोना रुग्ण ; 43 जणांची कोरोनावर मात

आतापर्यंत एकूण 695 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 579 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Palghar covid 19
पालघर कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 5, 2020, 9:36 AM IST

पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी 75 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी पालघर तालुक्यातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शनिवारी अढळलेल्या 75 कोरोना रुग्णांपैैकी 22 पालघर तालुक्यातील, 1 डहाणू तालुक्यातील, 2 जव्हार तालुक्यातील, 11 वाडा तालुक्यातील, 2 विक्रमगड तालुक्यातील आणि 37 वसई ग्रामीण भागातील आहेत. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1 हजार 292 इतकी झाली असून, 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 695 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 579 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

संपूर्ण राज्यातील शनिवारची परिस्थिती -

राज्यात शनिवारी 7 हजार 74 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 64 अशी झाली आहे. नवीन 3 हजार 395 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लाख 8 हजार 82 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 83 हजार 295 सक्रिय रुग्ण आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.