ETV Bharat / state

गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरण; २८ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल न झाल्याने जामीन मंजूर - mob lynching in palghar

डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील २८ आरोपींना स्थानिक न्यायालयाने डीफॉल्ट जामीन मंजूर केला आहे .

डहाणू प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी
गडचिंचले तिहेरीहत्या प्रकरण; २८ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल न झाल्याने जमीन मंजूर
author img

By

Published : Aug 11, 2020, 7:10 AM IST

Updated : Aug 11, 2020, 9:37 AM IST

पालघर - डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील २८ आरोपींना स्थानिक न्यायालयाने डीफॉल्ट जामीन मंजूर केला आहे . डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून जमावकडून दोन साधू व त्यांचा चालक अशा तिघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दाखल दोन आरोपपत्रात २८ जणांवर निर्दिष्टित दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. अशा २८ जणांना डहाणू प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.व्ही. जावळे यांनी जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिल्याचे वकील अमृत अधिकारी यांनी सांगितले.

१६ एप्रिल रोजी पालघरमधील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या तिहेरी हत्या प्रकरणात १६५ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील ११ जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील २ पोलीस अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच ३५ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ७ मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागातमार्फत करण्यात आला.

संबंधित प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. सीआयडीने याप्रकरणी आतापर्यंत ८०८ संशयितांची चौकशी केली असून १०८ जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. पहिल्या गुन्ह्यात १२६ आरोपींच्या विरोधात ४ हजार ९५५ पानांचे व दुसऱ्या गुन्ह्यात १२६ आरोपींविरोधात ५ हजार ९२१ पानांचे अशी दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्यात आली आहे.

Last Updated : Aug 11, 2020, 9:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.