ETV Bharat / state

मासे चोरल्याच्या वादात दाम्पत्याकडून वृद्धाची हत्या; पतीला अटक, पत्नी फरार

author img

By

Published : Sep 21, 2020, 8:38 AM IST

१९ सप्टेंबरच्या रात्री चौधरी मासे पकडण्यासाठी गेले असता, हे दाम्पत्यदेखील तिथेच होते. त्यावेळी चौधरी आणि दाम्पत्यामध्ये पुन्हा भांडण झाले, ज्यात या दाम्पत्याने चौधरी यांना मारहाण करत, त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. दुसऱ्या दिवशी चौधरी यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत गेले असता, हा प्रकार उघडकीस आला.

couple-kills-70-year-old-man-in-wada-palghar-husband-arrested
मासे चोरल्याच्या वादात दाम्पत्याकडून वृद्धाची हत्या; पतीला अटक, पत्नी फरार

वाडा (पालघर) : मासे चोरी करण्यावरुन झालेल्या भांडणात एक 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीला पालघर जिल्ह्यातील वाडा पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. वाड्यातील दिनकर पाडा येथे शनिवारी ही घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नारायण चौधरी यांच्या शेताजवळ मासे पकडायचे साधन तयार करण्यात आले होते. त्या साधनात पडलेल्या माशांची त्यांच्या शेजारील व्यक्ती चोरी करत असल्याचा त्यांना संशय होता. याचाच जाब विचारण्यासाठी गेले असता, चौधरी आणि त्यांच्या शेजारच्या दाम्पत्यामध्ये वाद झाला होता.

त्यानंतर, १९ सप्टेंबरच्या रात्री चौधरी मासे पकडण्यासाठी गेले असता, हे दाम्पत्यदेखील तिथेच होते. त्यावेळी चौधरी आणि दाम्पत्यामध्ये पुन्हा भांडण झाले, ज्यात या दाम्पत्याने चौधरी यांना मारहाण करत, त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. दुसऱ्या दिवशी चौधरी यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत गेले असता, हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी २० सप्टेंबरला सायंकाळी गुन्हा नोंदवल्यानंतर तीन तासांमध्ये पोलिसांनी दाम्पत्यापैकी पतीला अटक केली असून, पत्नीचा शोध सुरू असल्याची माहिती वाडा पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी दिली.

हेही वाचा : वाडा-भिवंडी महामार्गाची दुरवस्था, दुरुस्तीसह रस्ते अपघात समस्या कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.