पालघर - लॉकडाऊन काळात पालघर-टेंभोडे येथील जयेश आणि रेश्मा मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नाच्या बेडीत 'लॉक' झाले. या नवदाम्पत्याने लग्नसमारंभाला होणारा खर्च टाळून 10 हजार रुपयांचा धनादेश कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला आहे.
लॉकडाऊन : पालघरमधील नवदाम्पत्य लग्नाच्या बेडीत 'लॉक,' मुख्यमंत्री निधीत 10 हजारांची मदत - लॉकडाऊन काळात लग्नाच्या बेडीत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे अनेक लग्न समारंभ रद्द झाले आहेत. अनेक दाम्पत्यांनी लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. जयेश पमाळे व पारगाव येथील रेश्मा पाटील यांनीही लॉकडाऊन काही दिवसांनी संपेल, अशा आशेत विवाहसोहळा पुढे ढकलला. मात्र, हे लॉकडाऊन वाढतच चालल्याचे पाहिल्यानंतर जयेश व रेश्मा यांनी लॉकडाऊन काळातच लग्नाच्या बेडीत अडकण्याचे ठरवले.
पालघरमधील नवदाम्पत्य लग्नाच्या बेडीत 'लॉक
पालघर - लॉकडाऊन काळात पालघर-टेंभोडे येथील जयेश आणि रेश्मा मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नाच्या बेडीत 'लॉक' झाले. या नवदाम्पत्याने लग्नसमारंभाला होणारा खर्च टाळून 10 हजार रुपयांचा धनादेश कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला आहे.
Last Updated : May 13, 2020, 5:24 PM IST